नवीन लेखन...

परमार्थ व संसार आहेत एकच

उपास तापास करुनी,   शिणवित होतो देहाला
भजन पूजन करुनी,   पूजीत होतो देवाला   ।।१।।

कथा किर्तनें ऐकूनी,   पुराण मी जाणिले
माळ जप जपूनी,   प्रभू नामस्मरण केले   ।।२।।

वेचूनी सुमनें सुंदर,   वाही प्रभूचे चरणीं
फुलांचे गुंफूनी हार,   अर्पण केले कंठमणीं   ।।३।।

जाऊनी तीर्थ यात्रेत,   दर्शन घेतले तीर्थांचे
प्रसिद्ध देवालयांत,   चरण स्पर्षिले मूर्तीचे  ।।४।।

मनामध्यें ठेऊन शांती,   मूल्यमापन केले जीवनाचे
कांहीं न मिळाले हातीं,   व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे   ।।५।।

संसारातील प्रेम व राग,   ह्यातच मन गुरफटले
कर्तव्यातील एक भाग,   प्रभू भक्तीसी संबोधले   ।।६।।

परमार्थ आणि संसार,   भिन्न नाहींत दोन
प्रभूचाच आहे संसार,   मनी तूं हे जाण   ।।७।।

कर्म फळ आशा,   बाळगूं नको मनीं
तेंव्हा न येईल निराशा,   कर्म करिता क्षणीं   ।।८।।

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

1 Comment on परमार्थ व संसार आहेत एकच

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..