आपण पावसाळ्याची वाट अक्षरश: चातकासारखी पहात असतो. पावसाळा उशीरा आला तर आपल्याला दुष्काळाला तोंड द्यायला लागते. पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला तरीही दुष्काळाची भिती असतेच.
हाच पावसाळा आपल्याला वर्षभरासाठी पाणी देतो. या पाण्याचा उपयोग विविध कारणांसाठी होतो. पावसाळ्याबद्दलचे अंदाज आता हवामानखात्याकडून नियमितपणे दिले जातात आणि बर्याचदा ते बरोबरही असतात. भारत सरकारच्या हवामानखात्यची वेबसाईट अशीच परिपूर्ण आहे. इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांत असलेली ही वेबसाईट अनेक प्रकारची उपयोगी माहिती आपल्याला देते.
राज्यात मॉन्सूनबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी, हवामान कसे राहील याचा अंदाज पाहायचा असल्यास www.imd.gov.in या वेबसाईटला नक्की भेट द्या.
— पूजा निनाद प्रधान
Leave a Reply