नियतीचा फटका

(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)

एक भयानक रात्र अशी,  सहस्त्रावधींचा घेई बळी
नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी…१,

मध्यरात्र  होवून गेली, वातावरण  शांत होते
गादीवरती पडून सारे, स्वप्ने आपली रंगवीत होते,

तोच अचानक विषारी वायू,  पसरला त्या वातावरणी
हालचालींना वाव न देता,  श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी,

कित्येक जनांचे बळी घेतले,  सुलभ रितीने काळाने
शांत निद्रेची महा निद्रा,  करूनी टाकीली क्षणात त्याने,

भरडून गेले सारे परि, पापी वा पुण्यवान ते
कळला नाही हिशोब त्याचा, मोजमाप ते काय असते

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

About डॉ. भगवान नागापूरकर 1413 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…