नवीन लेखन...

गीतकार अशोकजी परांजपे

केतकीच्या बनी.. नाचला ग मोर’ या नाचऱ्या आणि चित्रमयी शब्दकळेचे गीतकार अशोकजी परांजपे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे झाला.

नाटककार गो. ब. देवल हरिपूरचेच. त्यांचा सार्थ अभिमान अशोकजींना होता. ग्राम संस्कृती आणि नागर संस्कृती, लोकरंगभूमी आणि नागर रंगभूमी अशा दोन स्वतंत्र विचारधारांमधील महत्त्वाचा दुवा म्हणजे अशोकजी परांजपे, त्यांचा प्रकृती पिंड गीतकाराचा. ललित लेखनात त्यांना विशेष रुची होती. दीनानाथ दलाल यांची चित्रे आणि अशोकजी परांजपे यांच्या काव्यपंक्ती असा सिलसिला अनेक दिवाळी अंकात सुरू असायचा. मुंबईत गिरगावातील झावबावाडीतील नॅशनल होस्टेलमध्ये अशोकजी परांजपे राहात. संध्याकाळी त्यांच्या गप्पा रंगत साहित्य संघाच्या कट्टय़ावर. अशोकजींना अभिजात वाङ्मयासारखंच लोकवाङ्मय प्रिय असे. शंकराचार्याचे श्लोक आणि पठ्ठेबापूरावांच्या लावण्या त्यांच्या ओठी असत. गीतकार, चित्रकार, नाटककार, लोककलेचे अभ्यासक अशा विविध भूमिकांमधून अशोकजी परांजपे यांनी मराठी लोकसंस्कृतीवर आपला आगळावेगळा ठसा उमटविला होता. अतिशय संवेदनशील, गप्पांमध्ये रंगणारे आणि गप्पा रंगविणारे अशी अशोकजींची प्रतिमा होती. त्यांना सतत लोकांतवास आवडत असे.

लोक कलावंतांमध्ये रमणारे अशोकजी सतत लोककलांमधील बलस्थाने शोधत राहायचे आणि लोक कलांमधील, अस्सल मराठी मातीतील उर्जा त्यांना गीतांसाठी नवी नवी शब्दकळा देऊन जायची. लोककला आणि लोककलाकारांवरचं प्रेम अशोकजींच्या नसानसातच होतं… कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, अवघे गरजे पंढरपूर, समाधी घेऊन जाई ज्ञानदेव यासारख्या गीतांमधून रसिकांना भक्तिरसात चिंब भिजवणारे ते नाविका रे वारा वाहे रे, केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर, दारी पाऊस पडतो रानी पारवा भिजतो, वाट इथे स्वप्नातील संपली जणू, पाखरा जा दूर देशी… यासारख्या भावगीतांमधून रसिकांना एका वेगळ्याच तरल भावविश्वात घेऊन जातात. निसर्गावरचं त्यांचं अपार प्रेम त्यांनी चितारलेल्या उत्तमोत्तम चित्रांमधून दिसायचं.

पं. जितेंद्र अभिषेकी, सुमन कल्याणपूर, सुधीर फडके, रामदास कामत, सुलोचना चव्हाण, अजित कडकडे, अरुण दाते आदींनी त्यांची गीते गायली. तमाशा, गोंधळ, वाघ्या-मुरळी या ज्या काही प्रमुख लोककला होत्या, त्यांचा त्यांनी आशय शोधून काढला आणि वर्तमानातील आधुनिक कलांवर असणारे त्यांचे ठसेही शोधून काढले. लोकपरंपरांमधील आख्याने त्यांनी नाट्यरूपात आणली.

“जांभूळ आख्यान’, “खंडोबाचे लगीन’, “दशावतारी राजा’, “वासुदेव सांगती’ अशा अनेक कलाकृती त्यांची आठवण करून देत राहतात. मुंबईच्या इंडियन नॅशनल थिएटर्सचे संचालक म्हणून काम पाहतानाही आणि त्यानंतरही कलाक्षेत्राशी जुळलेले त्यांचे नाते अखेरपर्यंत कायम होते. अशोकजी परांजपे यांचे ९ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

अशोकजी परांजपे यांची गाणी.




https://youtu.be/uNz8x7vFNg4

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..