नवीन लेखन...

मुंबई-पुणे: रेल्वे प्रवास

१८५३ मध्ये मुंबई ठाणे रेल्वे सेवा सुरू झाली तरी पुणं गाठणं कठीणच होतं. याचं कारण होतं, मधला अजस्र खंडाळा घाट. त्या काळात बग्गीतून किंवा घोड्यावर बसून मुंबई-पुणे प्रवास ३-४ दिवसांत पुरा केला जाई. सन १८३१ मध्ये मुंबई-पुणे पत्रं पाठविण्याची पोस्टाची सोय होती. या प्रवासास ४८ ते ७२ तास लागत. घोडे व बैलगाड्यांच्या मदतीनं भारतभर पत्रे पाठविण्याची सोय असे. त्यांना काही महिने लागत.

हळूहळू मुंबई ते कंपोली (खोपोली) व पुणे ते खंडाळा अशी रेल्वेसेवा सुरू झाली. मधला घाटाचा प्रवास तहूने केला जात असे. या संपूर्ण प्रवासाचं भाडं असं होतं.

• पुणे ते खंडाळा १० ।। आणे
• खंडाळा ते खोपोली, तट्टू १२ आणे
• खोपोली ते मुंबई १८ आणे

हा प्रवास म्हणजे एक दिव्यच असे. यावर एक आर्याही प्रसिद्ध झाली होती.
१४ जून १८५८ मध्ये पुण्यातील ‘ज्ञानप्रकाश’ अंकात मुंबई पुणे आगगाडीच्या प्रवासाविषयी एक बातमी छापण्यात आली होती. ती बातमी अशी होती: ‘आमचे वाचणारास आगीच्या गाडीचा रस्ता पुण्यापासून खंडाळ्यापर्यंत सुरू होणार या विषयी आशा देता देता आम्ही थकलो व आमचे लिहिणे वाचतांना कंटाळा आला असेल असे वाटते, परंतु आज रोजी आगीची गाडी पुण्याहून खंडाळ्यापर्यंत सुरू होणार आहे. अद्यापि दर, दाम यांचे जाहिरनामे, वगैरे काही एक व्यवस्थेचा प्रकार प्रसिद्धीस आला नाही, पण पुण्याहून आगीची गाडी सकाळी साडेसहा वाजता व सायंकाळी साडेतीन वाजता निघत जाईल येवढे मात्र तूर्त कळले आहे.’

‘चाऊ चाऊ’ या पुस्तकाच्या लेखिका लेडी फॉक्लंड यांनी लिहिले आहे, ‘पुण्यातील एका प्रवाशाने कंपनीला लिहिले, की हिंदू सोडता इतर धर्मांच्या व्यक्तींन शिवाशिवीच्या भीतीमुळे मी गाडीत बसू शकत नाही, आपल्यासाठी गाडीत १..ळे बसण्याची व्यवस्था करावी.’ रेल्वेने या मागणीचा साफ इन्कार केला; तेव्हापासूनच रेल्वेत जातपातीला मुठमाती मिळाली.’

खंडाळा घाटाची यशस्वी बांधणी १८७५ पर्यंत पूर्ण होऊन, १८८० पासून मुंबई-पुणे धुराची गाडी ८ तासांत हे अंतर कापू लागली. हा प्रवास देशातील सर्वोत्कृष्ट प्रवासातील एक म्हणून मानला जाऊ लागला . भारतीय रेल्वे इतिहासातील बांधलेला ‘ सर्वांत अवघड मार्ग ‘ म्हणून या मार्गाची जगात प्रसिद्धी झाली . थोड्याच वर्षांत रेल्वेची डेक्कन क्वीन ( दख्खनची राणी ) ही गाडी या मार्गावर दिमाखात धावू लागली . कवि वसंत बापटांनी यावर ‘ दख्खनची राणी ‘ ही सुरेख कविता लिहिली . नुकतेच दख्खनच्या राणीने ८७ व्या वर्षांत पर्दापण केलं . चित्तरंजन कारखान्यात बनलेलं इलेक्ट्रिक इंजिन ‘ लोकमान्य ‘ नावाने डेक्कन क्वीनला लागत असे . संपूर्ण दक्षिण भारत मुंबईशी या रेल्वेमार्गांनं जोडला गेला . आज या मार्गावर १०० ते १२५ प्रवासीगाड्यांची २४ तास ये जा चालू असते . आता हे अंतर इंटरसिटी एक्सप्रेस फक्त पावणे तीन तासात पार करते . थोड्याच वर्षांत एका तासाच्या आत हे अंतर कापले जाण्याकरता महत्त्वाकांक्षी योजना आखलेल्या आहेत . भारतीय रेल्वेच्या इतिहासात हा मार्ग म्हणजे मानाचा मुकुट आहे.

-–डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..