मुके भाव

आज लोपले शब्द ओठींचे,  भावनाच्या आकाशीं
प्रखर बनतां त्याच भावना,  विचार जाती तळाशीं….१,

भावनेला व्यक्त करण्या,  सांगड लागे शब्दांची
थोटके पडती शब्द सूर ते,  गर्दी होता विचारांची…२,

भावनांचे झरे फुटूनी,  विचार जलाशय झाले
विचारांचे बनूनी धबधबे,  वाहू मग लागले…..३,

आकार देती शब्द भाषा,  बांध घालूनी विचाराला
निश्चीत होतो वेग नी मार्ग,  आकार देता भावनेला….४,

भाषेमधली शक्ती जावूनी,  मूक बनविले तिने
उंचबळणाऱ्या विचार भावना,  टिपल्या मात्र चेहऱ्याने….५

— डॉ. भगवान  नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

About डॉ. भगवान नागापूरकर 1390 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…