मन तन बंधन

चंचल मन हे चंचल धारा,  पंख पसरीत उडे भरारा  ।

झेप घेवूनी उलटी सुलटी,  लक्ष तयाचे चमकत तारा  ।।

लुकलुकणारे तारे अगणित,  नभांग सारे प्रसन्न चित्त  ।

ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती,  झोके घेते सहज अविरत  ।।

वेळ क्षणाचा पुरतो त्याला,  टिचक्या टपल्या मारीत गेले  ।

आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले  ।।

कोठून येते त्याला शक्ती,  सटकून जाण्याची ही युक्ती  ।

अन्न पाणी हे कसे घेई ते,  पचनी सारे कसे पडते  ।।

हटवादी हे असे केवढे,  नको तिथेची जाय बापडे  ।

देहाला त्या भोग देऊनी,  भोग भोगण्या लावी तेवढे  ।।

स्वैराचारी बंध मुक्त ते, देहावरती राज्य करीते  ।

अवचित मिळता संत महात्मा,  बंधनात ते अडकून पडते  ।।

राज्य उलटते सारे आता,  मनावरती ताबा बसता  ।

माया जाते हारून जेथे,  ब्रह्मरूप ते सारे होता  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1821 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..