नवीन लेखन...

महाराष्ट्र आणि जागतिक कामगार दिन

|| हरी ॐ ||

आपण १ मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून साजरा करतो हे समजलं पण “जागतिक कामगार दिन” हा सुद्धा १ मे रोजीच का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. त्यासाठीच त्याची पूर्वपीठीका काय आहे ते थोडक्यात समजावून घेण्याचा प्रत्यत्न करणार आहोत.

दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. तसेच १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो.

कामगार दिन कसा सुरू झाला?
औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.

कामगारांच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या :-

१. कायद्याने ८ तासांचा दिवस
२. लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी
३. महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
४. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम
५. कायद्याने साप्ताहिक सुट्टी
६. कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा.
७. समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य. कामगारांच्या प्रमुख माग
्या होत्या

देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगातील ८0 देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणार्‍या कामगारांचा गौरव करण्यात येतो.

अनेक वर्षानंतर अधिकाधिक देशांतले कामगार १ मे दीनाच्या सोहळ्यात सामील होत गेले आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिन साजरा करु लागले. १ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिवसात होऊ लागला. १ मे दिवस ही सगळ्या कामगार चळवळीची परंपरा झाली. १९०५ च्या १ मे या दिवसासाठी लेनिनने लिहिलेल्या पत्रकात म्हटले होते, “कामगाराकामगारात, राष्ट्राराष्ट्रात, धर्माधर्मात असणारे शत्रुत्व नष्ट करा. या शत्रुत्वाने फक्त लुटारूंचा आणि जुलूमशहांचाच फायदा होतो, कारण ते कामगारवर्गातील अज्ञातावर आणि दुफळीवरच जगत असतात. ज्यू आणि ख्रिश्चन, फिन आणि स्वीडश, आर्मेनियन आणि तातार, पोलिश आणि रशियन, ल्याटिन आणि जर्मन सारे भेदभाव विसरून समाजवादाच्या एका झेंडयाखाली आपण सारे आगेकूच करूया. सर्व देशातील कामगारांची ही ऐक्यशक्ती, आंतरराष्ट्रीय समाजवादाची संघशक्ती, १ मे दिनाला आपल्या दलांची पाहणी करते आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यासाठीचा लढा निर्धाराने आणि अविचलपणे पुढे नेण्यासाठी आपले बल संघटीत करते.”

वर्षे लोटली तशतशा अधिकाधिक देशांतल्या तुकडया १ मे दिनाच्या सोहळ्यात सामील होत गेल्या आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिवस साजरा करु लागले आणि १ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिनात होऊ लागला. १ मे दिवस ही सर्व कामगार चळवळीची परंपरा झाली.

भारतातील पहिला कामगार दिन :-
भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

11 Comments on महाराष्ट्र आणि जागतिक कामगार दिन

  1. डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा केला.८तास कामाचे
    म्हणुन…
    जे सत्य आहे ते स्विकारायचं

    • हो बरोबर आहे बाबासाहेबांच्या प्रयत्नाने फक्त आज आपण 8 तास काम करतोय.वरील माहिती मध्ये याचा उल्लेख केला पाहिजे होता, पण का करत नाहीत हेच समजत नाही..उल्लेख न करून इतिहास लपवता येत नसतो.बाबासाहेबांनी कायदा केला नसता तर आजही 12तास काम करावे लागले असते सर्वांना.

  2. सर कामगारदिनाबद्दल फार छान माहीती दिली. परंतु आपल्याकडील चालणारी संथ न्यायालय पध्दतीमुळे खाजगी कारखाने याचा गैरफायदा घेऊन कामगारावर अन्याय करत आहेत. सरकारी अधिकारी आपले काम व्यवस्थितपणे पार पाडत नाही याचा तोटा कामगारांनाच सहन करावा लागतो. सरकारी अधिकारयांनी आपलया् कामाची तपासणी वेळेत व कोणत्याही अमिषाला बळी न पडता केली तरी बरयाच पमाणात कामगारावरील अनया कमी होईल.

  3. कायदा कोणी आमलनात अनला आणि कायदा कोणी तयार केला हे खर सांगायला लाज वाटते का? एकदा नीट गूगलवर सर्च करा YouTube vr pn paha lokana ugach चुकीचा मार्गा वर नका नेऊ

    • WHAT THE FACT YOU HIDING. IS IT POSSIBLE THIS ALL DEMAND ACCEPTED WITHOUT DR. BABASAHEB AMBEDKAR AND YOU NEVER UTTER A SINGLE WORD FOR HIM SO SAD

  4. सर आम्ही एक खाजगी मासिक चालवतो, ज्याचे नाव “शोध नव्या ध्येयाचा” आहे. आम्ही आपला लेख आमच्या मासिकामध्ये प्रसारित करण्यासाठी घेऊ शकतो का?

  5. The security staff also works carry their duties in the defined frame of work. I find they spend 12 hrs as their duty hours and get the salary thru the contractor . The contractors don’t pay them them the required salary on time and also they don’t get neither the weekly or monthly or festival holidays. If they remain absent from the work for health issues their salary is deducted for the day.
    Is there any value to this day if such an inhuman way still the methods of sucking the blood of the workers is continuing. Can one consider this celebration as mere show, false way projecting the human values.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..