लोभस चांदणे

चंद्र आज एकला नभी उगवला  ।
रात पुनवेची मधूर भासला  ।।
मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला  ।
शितल वारा अंगी झोंबू लागला  ।।

उलटून गेली रात्र मध्यावरती  ।
लुक लुकणारे तारे आतां दिसती  ।।
पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती  ।
तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती  ।।

त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे  ।
जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे  ।।
उघडूनी देई मनाची प्रेम कवाडे  ।
निघूनी जाई रात बघतां त्याजकडे  ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1500 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…