नवीन लेखन...

एलइडी टीव्ही

एलइडी टीव्ही हा असा एलसीडी टीव्ही असतो की, ज्यात बॅकलायटिंगसाठी एलइडीचा वापर केलेला असतो. पारंपरिक एलसीडी टीव्हीमध्ये बॅकलायटिंगसाठी कोल्ड कॅथोड फ्लुरोसंट लाईट्सचा वापर केलेला असतो, त्यामुळे तो प्रत्यक्षात एलइडी डिस्प्ले नसतो तरीही त्याला एलइडी टीव्ही असे म्हणतात.

एलइडी बॅकलायटिंग तंत्रज्ञानामुळे अतिशय चांगले बदल दिसून आले, ते म्हणजे एलइडी टीव्हीचे पॅनल अतिशय सडपातळ असते. त्यांना वीज कमी लागते. कॉन्ट्रास्ट चांगला असतो. लाईट एमिटिंग डायोड १९०७ मध्ये ब्रिटिश संशोधक एच.जे.राऊंड यांनी तयार केला होता. प्रत्यक्ष वापर करता येण्यासारखा एलइडी हा १९६२ मध्ये निक हालोनयाक यांनी तयार केला.

त्यानंतर १९७७ मध्ये जेम्स पी. मिशेल यांनी पहिला एलइडी टेलिव्हिजन स्क्रीन तयार केला. मॉड्युलर प्रकारातील हा डिस्प्ले एमव्ही ५० एलइडी वापरून बनवलेला होता व त्यात टीटीएल म्हणजे ट्रान्झिस्टर-ट्रान्झिस्टर लॉजिकचा वापर केला होता. सुरूवातीला यात तांबड्या मोनोक्रोमॅटिक एलइडींचा वापर केला जात असे. त्यानंतर निळे एलइडी आले व नंतर लाल रंगाचे एलइडी आले. रेड-ग्रीन-ब्लू म्हणजे आरजीबी अशा तीन प्रकारात त्यांचे उत्पादन १९९० च्या सुमारास सुरू झाले होते. एलइडी बॅकलिट एलसीडी टेलिव्हिजनमध्ये व्हाईट एज एलइडी हे स्क्रीनच्या रिमभोवती बसवलेले असतात.

डिफ्युजन पॅनल वापरून त्यांचा प्रकाश पसरवला जातो. आरजीबी डायनॅमिक एलइडीमुळे प्रकाश मंद करून कृष्णधवल प्रतिमा अतिशय उच्च कॉन्ट्रास्टने दिसते. एज एलइडी पद्धतीमुळे एलइडी टीव्ही या टीव्हीची जाडी कमी होण्यास मदत झाली. या एज एलइडीचा प्रकाश खास पॅनलने पसरवला जातो त्यामुळे एकसमान रंग पडद्यावर दिसतात. या टीव्ही तंत्रज्ञानामुळे वीज २०-३० टक्के कमी लागते. आरजीबी एलइडीमुळे रंगसंगतीही चांगली मिळते.

हा टीव्ही निकामी झाल्यानंतरही प्रदूषण होत नाही. त्याची किंमत मात्र जास्त असते. सोनी कंपनीने पहिल्यांदा एलइडी टीव्हीचे व्यावसायिक उत्पादन करून सोनी क्वालिया ००५ हा टीव्ही २००४ मध्ये बाजारात आणला होता. सोनी ब्राव्हियाच्या काही एलसीडी मॉडेलमध्येही आरजीबी एलइडी तंत्रज्ञान वापरलेले आहे. एज एलइडी लायटिंगचा प्रयोगही सोनी कंपनीने केला. त्यांनी ब्राव्हिया केएलव्ही ४० झेडएक्स १एम या मॉडेलमध्ये हे तंत्र वापरले. सीसीएफएल पेक्षा एलइडी चटकन चालू-बंद होत असल्याने प्रकाशाची निर्मिती अधिक असते. या प्रकारच्या टीव्हीमध्येही पिक्सेल सूत्र, स्कॅनिंग सिस्टीम व फ्रेम रेट हे तीनही घटक महत्त्वाचे ठरतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..