खरी पूजा

गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती  ।
श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती  ।१।

भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी  ।
शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई  ।२।

प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती  ।
विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती  ।३।

भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर  ।
पवित्रता भासे तेथे, बघता बाह्य परिसर  ।४।

गर्दी होती भाविकांची दर्शन घेण्या तेथे
साडी चोळी नेसवूनी अभिषेक करीत होते  ।५।

सामील झाला तोही इतर भक्त मंडळीत  ।
मनी इच्छीले कमी न पडावे तिच्या सेवेत  ।६।

साडी चोळी बांगड्या आणि पक्वान्नाचे ताट  ।
अर्पण केले जगदंबेला म्हणून स्तोत्र पाठ  ।७।

पूजा अर्चा संपवूनी डोंगर पायथी आला  ।
यथासांग विधीने मनी तोषला  ।८।

संपत असता यात्रा घटना एक घडली  ।
एक दुर्बल भिकारी, चक्कर येऊनी पडली  ।९।

धावून गेला मदत करण्या हा तिजला  ।
औषधोपचार करूनी, अन्न देई पोटाला  ।१०।

आशीर्वाद घेऊनी गेला, त्या दुर्बल बाईचे  ।
समाधान देई आनंद, त्याला या घटनेचे  ।११।

यात्रेमधला खरा आनंद तो यातच मिळाला  ।
श्री देवीच्या पूजेहूनी क्षण हा श्रेष्ठ तो ठरला  ।१२।

केली होती पूजा सेवा जीवंत आईची  ।
अंतर्मनाने पोच दिली खऱ्या समाधानाची  ।१३।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

 

 

 

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1415 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…