कवच

आघात होवूनी परिस्थितीचे,  सही सलामत सुटत असे
संकटाची चाहूल लागूनी,  परिणाम शून्य तो ठरत असे…१

दु:खाची ती चटकती उन्हे,  संरक्षणाची छत्री येई
कोणती तरी अदृष्य शक्ती,  त्यास वाचवोनी निघून जाई….२

दूर सारूनी षडरिपूला,  मनावरती ताबा मिळवी
प्रेमभाव तो अंगी करूनी,  तपशक्तीला सतत वाढवी…३

तपोबलाचे बनूनी कवच,  फिरत होते अवती भवती
दु:खाचे ते वार झेलूनी,  रक्षण त्याचे सदैव करिती…..

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७०८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1500 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…