नवीन लेखन...

कर्म

आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली. याचा अर्थ आपण मोठे होत नाही. आपण फक्त माध्यम असतो. कर्ता करविता तोच आहे. त्याने मनात आणले तर तो काहीही करू शकतो. कारण तो साक्षात परमेश्वर असतो. त्याची इच्छा नसेल तर या भूतलावर झाडाचे एक पान पण हलू शकत नाही.

अनेक लोकांना वाटत मी काही मदत एखाद्या व्यक्तीसाठी केली किंवा माझ्यामुळे कोणाचे काम झाले. हो तुम्ही मदत केली, तुमच्या मुळे एखाद्या व्यक्तीचे काम झाले. पण तुमच्या मनाला चालना कोणी दिली , ती चालना देणारा कर्ता करविता परमेश्वर असतो.

त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते, तो दिसत नाही. पण तो प्रत्येक वेळी आपल्या आजूबाजूला असतो. आपल्याला देवाने दोन डोळे दिले असताना आपण अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या ठिकाणी धडपडतो. कधी – कधी आपण पडतो. पण दृष्टिहीन व्यक्ती याला देवाने एवढी अंतर्मुख दृष्टी दिलेली असते. या व्यक्ती कधी आपणास कुठेही अडखळताना दिसत नाही.

आपण आपले कर्म करत राहावे, फळाची अपेक्षा करू नये. अनेक वेळा आपल्या ध्यानी मनी नसताना आपल्याला अनेक गोष्टी किंवा आपली इच्छा देव पूर्ण करतो. पण त्याला काही प्रमाणात प्रयत्नही करावे लागतात.
कोरोना आला तेव्हा सर्व मनुष्य वर्गाला माणुसकी काय असते, याचा अनुभव आला. कारण तेव्हा व्यक्ती कितीही धनाने श्रीमंत असली तरी तेव्हा पैसा कामाला आला नाही.

आज आपण जे काही चांगले कार्य करतो. तेच आपल्या पुढील आयुष्यात कामाला येणार आहे. कदाचित देव आपल्याला कोणाची सेवा करावयाची संधी देतो. आपण त्या संधीचा किती फायदा घेतो. आपण खरच वेळ आली की एखाद्या गरजवंताला मदत करतो का? हे तो परमेश्वर बघत असतो. कारण आपण कोणत्याही संकटात असताना आपण देवाचा धावा करतो. आपल्या जवळच्या मित्र परिवार यांना आवाज देतो. त्यातील काही लोक आपल्याला मदत करतात. काही करत नाही.

पण आपण त्याच्या वेळेस आपण किती मदत केली होती. मग ती पैशाची असो किंवा अन्य कोणत्या स्वरूपात हे महत्त्वाचे आहे. माझं – माझं करून आपण सर्व काही इथेच ठेऊन जाणार ! हे त्रिकाल बाधित सत्य आहे. आपण नेताना घेऊन जाणार तर आपण केलेले पुण्य कार्य, याचसाठी आपली आठवण काढली जाईल. सामाजिक कार्य किंवा अन्य कोणतेही कार्य करत असताना. एक व्यक्ती महत्वाची नसते. सर्व व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हाच एखादे सत्कर्म लवकर करू शकतात. त्यात जी व्यक्ती पुढाकार घेते. तिला पुढाकार घेण्यासाठी चालना देणारा परमेश्वर असतो. संघटना बांधली जाते. अनेक लोक एकत्र येतात. पण त्यांना एकत्र घेऊन येणारा कर्ता करविता तोच परमेश्वर असतो.

आपण कधी – कधी म्हणतो देवासारखा उभा राहिला आमच्या पाठीशी म्हणून आमचे काम झाले. जी व्यक्ती मदत करते , तिला मदत करायला प्रवृत करणारा परमेश्वर असतो. याच साधं उदाहरण म्हणजे आपल्या रोजच्या प्रवासात एखादी व्यक्ती चक्कर येऊन पडते. तेव्हा अनेक जण बघ्याची भुमिका घेतात. पण काही मोजक्याच व्यक्ती त्याला स्वतः कडील पाणी पाजतात. डॉक्टरकडे जायला काही मदत करतात. पण सर्वच व्यक्ती हा विचार करत नाही. त्यातील एखादा असतो. तो म्हणतो याच्या बॅगेत किंवा खिशात मला काही मिळेल तर खूप चांगल होईल.
याचेच साधे उदाहरण म्हणजे जत्रा किंवा आपण यात्रा म्हणतो या मध्ये तीन प्रकारचे लोक आढळतात. एक जत्रेत काही मिळेल म्हणून जाणारे ( चोरी करण्याच्या हेतूने) , दुसरा प्रकार जत्रेत जाऊन थोडी मौज मजा करावी म्हणून आणि तिसरी व्यक्ती आपण केलेला नवस पूर्ण करण्यासाठी जातात. तिन्ही व्यक्ती देवाची लेकरे पण तिन्ही व्यक्तिच्या मनात वेगवेगळी भावना असते.

शेवटी एक गोष्ट नक्की आहे.आपण केलेले पुण्य कर्म वाया जात नाही. आपल्याला कधी – कधी वाटते. देवाचा आपल्याकडे लक्ष नाही. पण त्याचा लक्ष सर्व गोष्टी कडे असतो. आपले कर्म जसे असेल तसे आपल्याला देव ठेवतो.
चांगले कार्य करत राहायचे. त्याचा हिशोब आपण न ठेवता तो परमेश्वर ठेवणार हे नक्की आहे.

त्याच्या वर आपला नितांत विश्वास पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त काही वेडी – वाकडी वळणे येतात. त्यांना वळसा घालून आपण आपल्या धैर्याकडे वाटचाल करणे आवश्यक आहे.

-किरण दत्ताराम आरोलकर

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 336 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..