जीवनानंतर हा मनावर अवलंबून असतो हे सगळ्यांना कळतं पण वळत नाही.रतीब घातल्यासारखं माणसं उठल्यापासून दुसऱ्यांना कसा धडा शिकवायचा याच्या नियोजनात व्यस्त असतात मग आनंद मिळणार कुठून? अतिरेकी विचार आनंदाला ठार करतात. अतिरेकी आनंदी लोकांना ठार करण्यास जसं मग पुढे पाहत नाहीत. काही माणसे आनंद उधळण्यासाठी जन्म घेतात तर काही माणसे आनंदाला उधळून लावण्यासाठी जन्म घेतात.तार्किकतेने आनंदाचे नियोजन करता येतं, पण बाह्य परिस्थिती तुमचे नियोजन उधळून लावू शकतें.
कुणी कुणाला समजवायचं मनाने शरीराला का शरीराने मनाला?मनाची सुनामी शेवटी शरीरानेच थंड करायची असते. शरीर ही जेव्हा मनाच्या सुनामीत सामील होतं, तेव्हा काहीतरी फार भयंकर घडतं. सुनामीला भौतिक घटना कारणीभूत ठरतात पण मनाच्या सुनामीला नैतिक अनैतिक असं काही नसतं. मन शांत असलं ते शरीरही शांत असतं. सात्विक विचार सातवी कृत्यालाच जन्म देतात. विध्वंसाचे प्रशिक्षण दुसऱ्यालाही संपवतं आणि स्वतःलाही संपवतं. अध्यात्माचौ प्रशिक्षण स्वतःमध्ये ही नैतिक बदल घडवून आणतं आणि दुसऱ्या मध्ये ही. शरीरातले स्नायू जेव्हा असहकार पुकारतात तेव्हा त्यांना फिजिओथेरपी देऊन पुन्हा तळ्यावर आणता येतं.
मनाला नाही समजवता येत. आपल्याच मृत्यूला थांबवणं मनाला जमत नाही. दुसऱ्यांचे मृत्यू वाचवणारे डॉक्टर स्वतःचा मृत्यू वाचवू शकत नाहीत कारण आपलं मनच आपल्या विरुद्ध जातं. मन चिंती ते वैरी चिंती असं म्हटलं आहे. बाह्य परिस्थितीने शरीराला थोडं नियंत्रित करता येतं पण मनाला नियंत्रित करता येत नाही वरवर जरी मन ताब्यात आहे असं वाटलं तरीही आत मध्ये प्रचंड सुनामी मनामध्ये चालू असते. मन हे हिमनगाच्या टोकांसारखं आहे, तळ कोणाला दिसत नाही आणि कोणाला समजून घ्यायची गरजही वाटत नाही. काही हसणाऱ्या माणसाचं जसं कपट दिसत नाही. चेहरे मुखवटे शिवाय जगू शकत नाहीत. मनातल्या प्रत्येक घटनेचा आरसा चेहरा असतो. मुखवटे म्हणजे पांघरूण असतं चुका झाकण्यासाठी.
मन खवळलेल्या समुद्रासारखं कधी कधी वागतं. थोडा वेळ गेला की भरतीची सुद्धा ओहोटी होते. अनेक तरंगांना सामावून डोह शेवटी शांतच असतो. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग तरंग आल्याप्रमाणे येतात आणि जातात. दगड पाण्यावर मारल्या वर तरंग उठतात पण दगडाचा मारा सहन करावा लागतो डोहालाच.कोणी विचार केला असता का, की प्राचीन जगातील महान तत्त्वज्ञ सौक्रेटीस, जो आपल्या शांततेसाठी, बुद्धिमत्तेसाठी आणि खोल विचारांसाठी ओळखला जातो,त्याने आपल्या आयुष्याचा मोठा भाग अशा स्त्रीसोबत घालवला, जिला त्याच्या संयमाची नेहमीच परीक्षा घ्यायची असे ?त्याची पत्नी तिच्या तीव्र बोलण्याच्या स्वभावासाठी, वर्चस्वासाठी आणि अविरत रागासाठी कुप्रसिद्ध होती. दररोज पहाटे ती त्याला घराबाहेर हाकलून द्यायची, आणि तो सूर्यास्ताच्या वेळीच परत यायचा.पण तिचा कठीण स्वभाव असूनही, सौक्रेटीस नेहमी तिच्याबद्दल आदराने आणि कृतज्ञतेने बोलायचा. त्याने एकदा कबूल केलं की, आपल्या काही शहाणपणाचं श्रेय तो तिला देतो,कारण अशा सततच्या परीक्षांशिवाय त्याला कधीच समजलं नसतं की खरी शहाणपण हे शांततेत असते, आणि खरी शांती ही निःशब्दतेत सापडते.
एके दिवशी, तो आपल्या शिष्यांसोबत बसलेला असताना, ती नेहमीप्रमाणे आरडाओरड करत होती, पण या वेळी तिने त्याच्यावर पाणी ओतलं. सौक्रेटीस अजिबात हलला नाही. त्याने शांतपणे चेहरा पुसला आणि म्हणाला, “ठीक आहे, मेघगर्जेनंतर पाऊस येणारच होता.”
तिची कहाणी अचानक संपली. एका रात्री, तिच्या एका रागाच्या भरात — जेव्हा सौक्रेटीस नेहमीप्रमाणे शांत आणि गप्प होता तिचा राग इतका उफाळून आला की तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती त्या रात्रीच मरण पावली.ती वादळासारखी कोसळली. तो मात्र शांत समुद्रासारखा स्थिर राहिला.तिचं नाव इतिहासात हरवून गेलं. त्याची शांतता मात्र दंतकथा झाली. ही केवळ संघर्षाची गोष्ट नाही ही आठवण आहे की, खरी ताकद ही निःशब्दतेत असते, आणि आयुष्यातील सर्वात कठीण लोकच आपले सर्वात मोठे गुरू ठरतात. फिजिओथेरपी शरीराला ठीक करतें, पण माईंड थेरपी मनाला ठिक करून आनंदाचा मार्ग मोकळा करतें. मनाच्या असंख्य प्रश्नांना आपण उकल करण्याच्या दिशेने गांभीर्याने पावलें उचलली तर जीवनातला आनंद दूर नाही. मनाचं पालन पोषण करण्यासाठी माणसांचा गोतावळा भावनांचा हास्यकल्लोळ असेल तर पारिजातकाचा सड्या प्रमाणे आनंद आपल्या अंगणात न सांगता पडतो.
डॉ. अनिल कुलकर्णी
Leave a Reply