नवीन लेखन...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मधुकर दत्तात्रेय देवरस ऊर्फ बाळासाहेब देवरस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मधुकर दत्तात्रेय देवरस ऊर्फ बाळासाहेब देवरस यांचा जन्म ११ डिसेंबर १९१५ रोजी झाला.

एक नि:स्वार्थ, निरपेक्ष, संयमी पण धडाडीचे विवेकी आणि चैतन्यशील नेतृत्व अशी श्री. बाळासाहेबांची प्रतिमा होती. बाळासाहेब वयाच्या ११ व्या वर्षी शाखेत रुजू झाले आणि संघरूप झाले. परंपरा आणि आधुनिकता यांचा प्रगतीपर संगम त्यांच्या नेतृत्वात होता. हे नेतृत्व निरहंकारी होते, पण त्याचवेळी देशाचे भवितव्य संघाच्या द्वारे घडविण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्या ठायी होता.” बाळासाहेबांचे नाव मधुकर देवरस, मात्र ते बाळासाहेब नावाने अधिक परिचित होते.

गोळवलकर गुरुजींच्या निधनानंतर १९७३ साली त्यांनी संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या सरसंघचालक पदाच्या कारकिर्दीत संघाला एक नवी दिशा मिळाली आणि संघाने पूर्वांचल राज्यातून वनवासी क्षेत्रांतून सेवाकार्याला सुरुवात केली. त्यांनी २१ वर्ष सरसंघचालकपद भूषविले.

भारतीय विचार साधना ने बाळासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची महती विषद करणारे पुस्तक निर्माण केले आहे. शरद हेबाळकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. बाळासाहेबां वरील हे पुस्तक म्हणजे ७० वर्षांचा संघाचा इतिहास आहे, असे म्हटले तर काहीच वावगे ठरणार नाही. त्यांचा स्वयंसेवक – सरसंघचालक हा प्रवास ‘श्री बाळासाहेब देवरस’ ह्या पुस्तकातून मांडला गेला आहे.

बाळासाहेब देवरस यांचे १७ जून १९९६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..