दुःख कसे विसरलो

काय केले दुःख विसरण्याला
मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   ।।धृ।।

निराशेच्या काळांत
दुःख होते मनांत
हार झाली जीवनांत
शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला   ।।१।।

मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला
चूक राई एवढे
दुःखाचा पर्वत पडे
मनीं पश्चाताप घडे
भोग भोगण्या, झालो तयार   ।।२।।

मुक्ति जमली नामीं आनंद आणण्याला

 

एकाग्र चित्तांत
जातां ध्यानांत
डूबता आनंदात
विसरुन गेलो जगाला   ।।३।।

मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला

 

सारी ऊर्जा जाई
ध्यानांत एकरुप होई
त्यांत ईश्वर पाही
ऊर्जा शिल्लक न राही, दुःख भावनेला   ।।४।।

मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1588 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…