नवीन लेखन...

मिनीस्कर्टच्या जनक डेम मेरी क्वांट

डेम मेरी क्वांट या फॅशन जगतातील सर्वात जास्त प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होत्या. डेम मेरी क्वांट या मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट डिझाइन करण्यासाठी ओळखल्या जातात.

डेम मेरी क्वांट यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९३० रोजी ब्लॅकचेथ लंडन येथे झाला. लहानपणापासून डेम मेरी क्वांट आपली स्वत:ची काही तरी वेगळी स्टाइल तयार करण्याचा प्रयत्न करत. पण व्यवसायानं शिक्षक असलेल्या आई-वडिलांचा त्यांनी फॅशन क्षेत्रात जायला विरोध होता. त्यामुळे मेरी यांना ‘आर्ट स्कूल’वर समाधान मानावं लागलं. तरीही शेवटी त्यांना हवं ते त्यांनी केलंच. ‘गोल्डस्मिथ्स’ कॉलेजमध्ये शिकताना मेरी यांची अलेक्झांडर प्लंकेट ग्रीन यांच्याशी ओळख झाली. दोघं प्रेमात पडले आणि १९५७ मध्ये त्यांनी लग्न केलं. पण त्याआधीपासूनच फॅशनमध्ये करिअर करण्याच्या मेरी यांच्या स्वप्नाला अलेक्झांडर यांचं बळ मिळालं होतं. अलेक्झांडर यांना व्यवसायाची उत्तम जाण होती. त्यांनी लंडनमध्ये किंग्ज रोडवर एक रेस्टॉरंट सुरू केलं होतं आणि रेस्टॉरंटच्या वरची जागा ‘बझार’ दुकानासाठी मेरी यांना मिळाली व लंडनच्या किंग रोडवर त्यांनी त्यांचे पहिले स्टोर सुरु केले.

पहिला मिनीस्कर्ट १९६३साली लंडनमधील त्यांच्या बुटीक “बाझार” येथे विकले गेले आणि लवकरच “वोग” या फॅशन मासिकाच्या पृष्ठांवर दिसू लागले. मिनीस्कर्टची कॅटवॉक करणारी मॉडेल ट्विगी ही पहिली होती. असे काही लोक होते ज्यांनी मेरी यांची मिनीस्कर्टवर निंदा केली पण त्यांनी “मी मिनीस्कर्टचा शोध लावला नाही, परंतु तो लंडनच्या रस्त्यावर बनवला आहे. मी फक्त साधे कपडे बनवले आहेत ज्यात तुम्ही चालू शकता. “, उडी मारून धावू शकता. लांबी ग्राहकांनी स्वतः ठरवली होती. मी बनवलेला स्कर्ट खूपच लहान होता आणि ग्राहक ओरडत होते: ‘छोटा, छोटा’.” या शब्दांत स्वतःचा बचाव केला. डेम मेरी क्वांट यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. १९६३ साली डेम मेरी क्वांट यांना इनॉगरल ड्रेस ऑफ द ईयर अवॉर्ड देण्यात आला. त्यानंतर १९६६ साली त्यांना फॅशन जगातील योगदानासाठी ओबीई अवॉर्ड दिला गेला. हेरियट-वाट युनिवर्सिटीने त्यांना २००६ साली डॉक्टरेट उपाधी देऊन सन्मानित केले होते.

डेम मेरी क्वांट यांचे १३ एप्रिल २०२३ रोजी निधन झाले.

-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..