नवीन लेखन...

क्रिप्टोग्राफी

सध्या ऑनलाईनच जमाना आहे. इंटरनेटवर चक्क वस्तूंचा बाजारही भरतो, त्यात तुम्ही मागणी नोंदवता किंवा बुकिंग करता. पण यात पैशांचे व्यवहार कसे होतात, हवी तेवढी रक्कम हव्या त्या व्यक्तीला किंवा संस्थेपर्यंत कशी पोहोचते, आपल्याला माहिती नसलेल्या माणसांशी आपण असे व्यवहार एका साखळीमार्फत कसे करू शकतो, याला इलेक्ट्रॉनिक व्यवहार असे म्हणतात.

या तुम्ही अमुक एका व्यक्तीला अमुक एवढे पैसे द्या असे लिहिलेला संदेश असतो व इतरही माहिती असते. ही माहिती ही केवळ तुम्ही आणि ती व्यक्ती यांच्या पुरतीच मर्यादित राहते. इतरांना ते कळत नाही. हे गणितावर आधारित असं तंत्रज्ञान आहे, त्यालाच एनक्रिप्शन किंवा क्रिप्टोग्राफी असे म्हणतात.

गुप्त माहिती शत्रूच्या हाती न पडता हवा त्या व्यक्तींना कळावी यासाठी लष्करातही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. एनक्रिप्शन याचा अर्थ संकेतीकरण. एखादी गोष्ट आपण सांकेतिक भाषेत सांगतो त्याला कोडींग असं म्हणतात, तोच हा प्रकार आहे. या तंत्राचा शोध स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे गणितज्ञ व्हिटफिल्ड डिफी व मार्टिन हेलमन यांनी लावला. नंतर रॉन रिव्हसेट, अदि शमीर, ॲ‍डलमन यांनी आरएसए कोड शोधले. एनक्रिप्शन साठी वेब ब्राउझर्स हे एसएसएल (सिक्युअर सॉकेट लेअर) वापरतात.

1911 मध्ये अमेरिकी अभियंता फिलीप झिमरमन याने ‘प्रिटी गुड प्रायव्हसी’ हे पीसीसाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर तयार केले. जेव्हा ऑनलाईन एखादी माहिती वापरली जाते तेव्हा त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते, त्यामुळे सांकेतिक भाषेत ती द्यावी लागते.

जेव्हा आपण इंटरनेटवरून ईमेल पाठवतो किंवा ब्राउझिंग करतो, तेव्हा ती माहिती अनेक यंत्रांच्या साखळीतून आपल्यापर्यंत येत असते किंवा जात असते. ही माहिती काही लोक बघू शकतात. विकीलीक्स प्रकरणात हेच झाले. तो अशा माहितीवर घातलेला दरोडा होता. शक्यतो एन्क्रिप्शनमुळे माहिती सुरक्षित राहते कोणालाही बघता येत नाही. मांजराला कुत्रा म्हणायचे असे दोघांमध्ये ठरले असेल तर तो एक संकेत झाला. अशा सांकेतिक शब्दावलीतून संदेश पाठवले जातात, त्याला ‘सिक्रेट की क्रिप्टोग्राफी’ म्हणतात. गुप्तहेरांमध्ये ही सांकेतिक भाषा चालते. यात दोन व्यक्तींना संकेत आधीच माहीत असतात.

सार्वजनिक पातळीवर जे रक्षण केले जाते त्यात प्रत्येक व्यक्तीसाठी एक पब्लिक की व एक सिक्रेट की असते. डिजिटल सिग्नेचर टाकून हे काम केले जाते. एनक्रिप्टेड संदेश हा गार्बेजसारखा दिसतो. तो कधीच कळत नाही, त्याचे स्क्रॅम्बल्ड व्हर्जन कळणे कठीण असते. तरीही पब्लिक की एनक्रिप्शन हे पुरेसा वेळ घेतल्यास तोडता येते व गुप्त संदेश चोरून वाजता येतो. त्यामुळे या की अवघड म्हणजेच १०२४ लांबलचक असतात, यामुळे त्या तोडता येत नाहीत.

संदर्भ : मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने – ‘कुतुहल’  या सदरामधील लेख – राजेंद्र येवलेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..