नवीन लेखन...

चिकाटी

‘ जो राह चुनी तूने, उस राह पे राही चलते जाना रे,
हो कितनी भी लंबी रात, राही चलते जाना रे’

हे गाणे आपल्याला जगण्याची कला शिकवते. ह्या विश्व रंगमंचावर अनेक पात्र आपण बघत आहोत. सगळ्यांची जगण्याची तऱ्हा निराळी. कोणी आयुष्यभर जे आहे त्याला जपण्याचा प्रयत्न करत राहतात तर कोणी सतत आपली choice बदलत राहतात. आज आपण आपल्या आजूबाजूला कित्येक लोकांना बघतो की ते एखादी नोकरी, व्यक्ति, वस्तु सतत बदलत असतात. जे आयुष्यात मिळाले ते टीकवून ठेवण्याची चिकाटी कमी झालेली दिसून येते. खरंच इतकं सहज असतं का हे बदलणं? पूर्वीच्या काळी मनुष्य काही ही झालं तरी ह्या गोष्टींना बदलताना विचार करायचे पण आज बिनधास्त व्यक्ति, वस्तु बदलत राहतात. एखाद्या व्यक्ति बरोबर लग्न करावं लागलं असेल तर त्याला शेवट पर्यन्त टिकवण्याची शक्ति ठेवायचे. त्यासाठी सहन करावे लागले तरी ते करायचे. जो मार्ग निवडला त्यावर चालण्याची चिकाटी असायची, म्हणूनच ते आपल्या ध्येयाला गाठू शकायचे. नाहीतर जीवनाचे लक्ष्य सुद्धा परिस्थितीनुरूप बदलत राहते.

आजचे आपले जगणे इतके गतिशील झाले आहे की प्रत्येक गोष्ट लवकर हवी. झटपट मॅगी, फास्ट नेटवर्क, रातोरात श्रीमंती.. .. अश्या अनेक गोष्टी आपण बघतो त्यामुळे काही मिळवण्यासाठी परिश्रम, चिकाटी, जिद्द हवी हे आता विसरत चालले आहेत. शालेय जीवनामध्ये value education दिले जाते पण practical जीवनात मात्र काही दिसून येत नाही. इमानदारी, चिकाटी, जिद्द, प्रामाणिक हे सर्व फक्त कथा कादंबऱ्या मध्येच वाचायला मिळतं. आज एखाद्या बीजाला रोपट्यामध्ये व रोपट्याला वृक्षा मध्ये रूपांतरित व्हायला वेळ लागतो. त्यासाठी आपल्यामध्ये धैर्य हवे. जर ते नसेल तर बीज वृक्षाचे रूप घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ बांबूचे झाड. बांबूचे बी जमिनीत पेरल्यावर त्याचे रोपटे दिसायला ४ ते ५ वर्ष लागतात. पण त्या आधी सतत त्याला खत पाणी दयावे लागते. पण एकदा का रोपटे आले की ६ महिन्यात ते ८० फुट उंच वाढते. आपण जर मनात विचार आणला की ४ वर्ष हे बियाणे जमिनीत काय करत होते. कोणी ६ महिन्यात इतके उंच वाढू शकते? पण ती ४ वर्ष गुप्त रित्या तो बांबू आपला पाया मजबूत करत होता. हा पाया जर मजबूत नसेल तर झाड इतके उंच वाढू शकेल? तसेच आयुष्यात काही मिळवायचे असेल, स्वतःला घडवायचे असेल तर सतत प्रयत्नशील राहावे. एखादा व्यक्ति डॉक्टर, इंजीनियर, वकील.. .. होतो त्यापाठी ही तीच चिकाटी आहे. प्रत्येक वर्षी स्वतःवर केलेल्या परिश्रमाचे ते फळ आहे. जर ही चिकाटी नसती तर ती पदवी सुद्धा प्राप्त झाली नसती. काही लोक अशी ही दिसून येतात जी प्रत्येक वर्षी कॉपी करून पास होतात किंवा लाच लुचपत देऊन आपले ध्येय गाठतात. तो वेगळा विषय आहे.

मनुष्य एखादी प्राप्ती करण्यासाठी उपवास किंवा तप करतो त्यासाठी सुद्धा चिकाटी हवी. काही दिवस अन्न, पदार्थ ह्यांचा त्याग करण्यासाठी मनावर काबू ठेवण्याची शक्ति हवी. म्हणजेच काही मिळवायचे असेल तर त्यासाठी सतत परिश्रम व निरंतरता हवी त्यालाच आपण चिकाटी म्हणू शकतो. काही अश्या ही आसामी बघितल्या असतील ज्यांना ईश्वरावर जबरदस्त विश्वास असल्या कारणाने ते गिरनार सारखे उंच डोंगर चढतात. मग एखादा आजार असो की वयस्कर असो पण दर्शन घेण्याची चिकाटी असल्यामुळे ते सामर्थ्य त्यांच्यामध्ये येते. जबरदस्त इच्छाशक्ती ह्या पाठी काम करत असते. आज ते मिळवण्याच्या मार्गावर अडचण नाही येत असं ही नाही. पण आलेल्या अडचणींना तोंड देण्याची हिम्मत सुद्धा हवी. मूर्तिकार जेव्हा दगडावर हातोडयाचे घाव घालतो तेव्हा त्या दगडात सहन करण्याची ताकद असल्यामुळे त्याचे रूपांतर एका सुंदर मूर्ती मध्ये होते. जर दगड मूर्ती बनण्या आधीच तुटला तर त्याचे स्थान मंदिर नसून musium होते. प्रत्येक वस्तु, पदार्थ, व्यक्ति जर ह्यांना ‘वेस्ट टू बेस्ट’ बनायचं असेल तर चिकाटी हवी. आपल्या समोर किती तरी उदाहरणे आहेत जी आपल्याला चिकटीचे किती गोड फळ मिळू शकते हे सांगतात. पण ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी हाल अपेष्टा सहन करून ही आपली जिद्द सोडू नये हे त्यातून शिकायला हवे. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, तसेच अनेक वैज्ञानिक ह्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून चिकाटीने मेहनत करून ते प्राप्त केले.

आयुष्याचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. कधी कुठे आपली हिम्मत ढासळली, मन खचून गेले, डोळ्यासमोर गच्च अंधार निर्माण झाला तरी पाऊल मागे वळवू नका. हरलो, पडलो, रडलो,.. .. तरी चिकाटीने पुढे जा कारण ‘कोशिश करनेवालों की हार नही होती’.

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..