चाकोरी

नव्हतो आम्ही आमचे कधींही   बनले जीवन दुजामुळे  ।

कर्तेपणाचा भाव तरीही      येतो कां मनी ? ते न कळे  ।।

 

कसा आलो या जगतीं    ठाऊक नव्हते कांही मजला  ।

कसा वाढलो हलके हलके     जाण आहे याची मला  ।।

 

जेंव्हा झालो मोठा कुणीतरी   वाटू लागले कांही करावे  ।

काळाने परि दिले दाखवूनी   जीवन प्रवाही वाहात जावे  ।।

 

परिस्थितीच्या काठामधूनी    जीवन सरिता वाहात जाते  ।

वाहात असता त्याच दिशेनें    इच्छीत ध्येय हातीं नसते  ।।

 

होते सारे अखेर तेचि    आखून ठेवते नियती जे जे  ।

अज्ञानानें समजत राही     हे केले मी, अन् हे माझे  ।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

 

 

 

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1728 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…