नवीन लेखन...

चार “हिश्श्या”तील सुख

बंकटमल नावाचे एक व्यापारी होते. चांगला व्यापार करून त्यांनी भरपूर धन मिळविले होते. इतके, की ही संपत्ती ठेवायची तरी कोठे या चिंतेने त्यांना ग्रासलेले होते. त्यामुळे एवढा प्रचंड पैसा असूनही त्यांना सुख म्हणजे काय? हेच माहीत नव्हते.

एकदा ते असेच संपत्तीची काळजी करत करत गावाबाहेर फिरायला गेले. सायंकाळ सरत आली होती. पाखरे आपल्या घरट्यात परतत होती. निसर्गामुळे वातावरण सुंदर बनले होते. रस्ताच्या एका कडेला असलेल्या शेतात एक शेतकरी अत्यंत आनंदाने व उत्साहाने गाणे गात आपले काम करत होता.

बंकटमल त्याच्या जवळून जाताना त्याने त्यांना पाहिले व गाणे थांबवून स्मितहास्य केले. ते पाहून बंकटमलही तेथे थांबले. त्यांना त्या शेतकऱ्याच्या आनंदाचे रहस्य जाणून घ्यायचे होते. ते त्या शेतकऱ्याला म्हणाले, ‘ आज तुम्ही भलत्याच खुशीत दिसता. काय कोठे जमिनीत पैशाचा हंडा सापडला की काय?’

त्यावर शेतकरी म्हणाला, ‘ ‘ छे छे, मी एक साधा शेतकरी आहे. दिवसभर शेतात राबतो. जी काही कमाई होते तिचे मी चार हिस्से करतो व माझी ती जबाबदारी आहे, असे समजून कर्तव्यपूर्तीच्या आनंदात समाधान मानतो.

त्यावर बंकटमल म्हणाले, की चार हिस्से म्हणजे? त्यावर शेतकरी म्हणाला, ”माझ्या आई-वडिलांनी मला वाढविले. मात्र आता ते थकले आहेत; त्यामुळे कमाईचा एक हिस्सा त्यांना देतो. दुसरा हिस्सा माझ्या लहान मुलाबाळांना देतो कारण त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी माझी आहे तर समाजाचे ऋण म्हणून तिसरा हिस्सा दानधर्मात खर्च करतो व चौथ्या हिश्श्यात मी माझे घर चालवितो. ”
बंकटमलला पैसा कसा खर्च करायचा व आनंद कसा मिळवायचा याचा वस्तुपाठच मिळाला होता. त्याप्रमाणे त्याने ‘सुखी’ होण्याचा निर्णय घेतला.

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..