बॉलीवूडची शपित यक्षिणी अभिनेत्री रेखा यांचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांची मुलगी असलेल्या रेखा या गेल्या तीस वर्षांहूनही अधिक काळ बॉलीवूडमध्ये असून त्या अगदी सुरुवातीपासूनच आश्वासक अभिनेत्री म्हणून ओळखली गेली आहे. रेखा यांचे मुळ नाव भानुरेखा पण सिने सृष्टी साठी त्यांनी रेखा हे नाव धारण केले. १९७० […]
वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचे हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९६९ रोजी झाला. त्यांना सुरुवातीचे सांगीतिक धडे घरातून, आई शोभा अभ्यंकर यांच्याकडून मिळाले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतले. हिराबाई बडोदेकर आणि वसंतराव देशपांडे यांनी त्यांना जसराजांकडे शिकायला पाठविण्याची शिफारस केली. जसराजांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांची संगीत दिनचर्या संपूर्णत: बदलली. गुरु-शिष्य परंपरेनुसार त्यांचे शिक्षण चालू झाले. जसराजांच्याबरोबर […]
गुप्तहेर म्हणजे बॉन्ड.. जेम्स बॉन्ड.. असे समीकरण असणा-या जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातल्या जवळपास ५० टक्क्य़ांहून अधिक लोकांनी जेम्स बॉण्ड हे नाव ऐकलेलं आहे. जगातल्या इतर कुठल्याही चित्रपटाला बॉण्डपटांइतकी लोकप्रियता मिळालेली नाही. ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बॉन्डच्या पात्राला जन्म दिला आणि पाहता पाहता संपूर्ण जगभरातील सिनेचाहत्यांना बॉन्डपटाचे वेड लागले. […]
‘मराठी साहित्यात जोपर्यंत ललित नियतकालिकं चालू राहतील तोपर्यंत अनंत अंतरकरांचं नाव कायम टिकून राहील’, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कै. अनंत अंतरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात काढले होते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९११ रोजी जमखिंडी येथे झाला. ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ ही अनंत अंतरकरांनी सुरू केलेली ललित नियतकालिके केवळ दर्जेदार साहित्याच्याच जोरावर आज ७० वर्षे झाली […]
बॉबी मधील गाण्याने ज्या ‘मैं शायर तो नहीं मगर ऐ हसीं’ या गाण्याने जी धमाल उडवली. या गाण्याचे गायकानी हे गाणे आपल्या जीवनात पहिल्यांदा गायले होते व जो या फिल्मी सृष्टीत अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन आला होता. त्यांचे नाव शैलेंद्रसिंग.त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. शैलेंद्र सिंग, यांचा जन्म मुंबईतलाच, कॉलेज झाल्यानंतर अभिनेता होण्याचे भूत त्यांच्या अंगात होते […]
सरस्वती अब्दुल राणे! अर्थात..सरस्वतीबाई राणे! सरस्वतीबाई राणे ऊर्फ सकीना उर्फ यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी रोजी झाला. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व […]
नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. अनंत दामले यांनी १९३० ते १९९० अशी जवळ-जवळ सहा दशके मराठी संगीत रंगभूमी आपल्या गायकीने व अभिनयाने ९२ नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका करीत समर्थपणे गाजविली. आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीच्या काळात अनंत दामले यांनी अनेक भूमिका वठविल्या, परंतु […]
भारतीय नाटय़सृष्टीवर सर्जनशील लेखनाची छाप उमटवणारे नामवंत नाटककार आणि प्रतिभावंत साहित्यिक महेश एलकुंचवार यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९३९ रोजी विदर्भातल्या पारवा या गावात झाला. त्रिधारा या नाट्य प्रकाराने मराठी नाटकाला जागतिक पातळीवर एक वेगळा आयाम मिळवून देणारे प्रयोगशील नाटककार म्हणून महेश एलकुंचवार परिचित आहेत. महेश एलकुंचवार यांचा जन्म तेलगु भाषक कुटुंबात झाला. त्यांची मातृभाषा तेलगूच. पारवा गावातच प्राथमिक […]
प्रख्यात सरोद वादक अमजद अली खान यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला. सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून ‘स्थलांतरित’ होत होत हे वाद्य अमजद अलींच्या ‘बंगश’ घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं. काळाच्या ओघात बरेच रचनात्मक बदल होत सरोदनी आजचं स्वरूप घेतलं आहे. वादनाची विशिष्ट पद्धत हे […]
प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम यांचा जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. बाबा कदम यांचे खरे नाव वीरसेन आनंद कदम होते. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांच्या कथा, कादंबर्यानत मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, […]