रामानंद रसागर यांचा जन्म लाहोर जिल्ह्य़ातील असलगुरूके या गावी झाला. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी झाला. त्यांचा मूळ परिवार पेशावर येथील. पेशावर सोडून ते काश्मीर येथे स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा, मूळचे श्रीमंत- आजोबा लाला गंगाराम यांनी आयात निर्मात व्यवसायांत अथक परिश्रम घेऊन एवढे उच्चस्थान प्राप्त केले की, समाजातील लोक त्यांना नगरश्रेष्ठ म्हणून संबोधत. रामानंद यांचे […]
मोठाल्या मिशांचे कवी नायगावकर हे घरोघरी हास्याची कारंजी फुलवत असतात.त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९४७ रोजी वाई येथे झाला. अशोक नायगावकर यांचे लहानपण गरीबीमुळे कष्टात गेले. त्यांची आई जी कामे करत असत त्याला ते मदत करत. आईबरोबर पापड करणे, मसाले कुटणे अशी सर्व कामे अर्थार्जनासाठी केली. याचवेळी प्र. के. अत्रे, लोहिया, दादासाहेब जगताप अशा अनेक लोकांची भाषणे त्यांनी ऐकली. नायगावकरांनी […]
भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित “जिंदादिल” भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. त्यांचे वडील वेदपंडित, तो वारसा भाऊसाहेबांनी कायम ठेऊन, संस्कृत, मराठी, उर्दू, इंग्रजी, भाषेवर प्रभुत्व मिळवले. नागपुरातून विधी शाखेची पदवी प्राप्त करून, १९३५ साली भाऊसाहेबांनी यवतमाळ येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. वकीली व्यवसायात भाऊसाहेबांनी फौजदारी खटल्यां मध्ये भरपूर यश […]
हुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. त्यांचा जन्म १९१६ रोजी जालंधर येथे झाला. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते. […]
प्रभाकर पंडित यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी झाला. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले. संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे “मधुवंती व्हायोलिन विद्यालया”चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे ते काम करत होते. […]
सलमान खान हा प्रसिध्द चित्रपटलेखक सलीम खान यांचा मुलगा. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला. सलमान यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याच्याकडे आजच्यासारखी शरीरयष्टी नव्हती. सडपातळ शरीरयष्टीचा हा मुलगा उद्याचा मोठा स्टार होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणा-या सलमान यांचा दुसराच चित्रपट ‘मैंने प्यार किया’ सुपरडूपर हिट झाला. या […]
प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची कन्या गिरिजा ओक. तिचा जन्म २७ डिसेंबर रोजी झाला. १५ वर्षाची असताना तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओक चा विवाह सुरुद गोडबोले बरोबर झाला आहे. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘गुलमोहर’, ‘मानिनी’, आणि ‘अडगुळे मडगुळे’ या चित्रपटांत तिने काम केले आहे. ‘लज्जा’ या झी मराठी वरिल […]
नाटय़, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तिन्ही माध्यमांद्वारे रसिकांत लोकप्रिय झालेले फारुख शेख यांनी वकिलीचे शिक्षण घेत असतानाच नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी झाला. ७०-८० च्या दशकात फारूक शेख यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. समांतर चित्रपट आणि तसेच मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये त्यांचा मुक्त संचार सुरू होता. त्यांिनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले. विनोद आणि संवेदनशील विषयांवर […]
मालती पांडे यांच्या घरात संगीताचे वातावरण होते. त्यांचा जन्म १९ एप्रिल १९३० रोजी झाला. लहानपणापासूनच गाण्याच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मालती पांडे यांनी त्रिवेदी सर व नाशिकचे भास्करराव घोडके यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. किशोरवयातच त्या गाण्याच्या बैठकी करू लागल्या. महाविद्यालयात असताना ”घराबाहेर ”या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. त्यामुळे प्रभातच्या ”आगे बढो”साठी सुधीर फडके यांनी मालती बाईना बोलावले. […]
स्पष्टवक्तेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी झाला. माडखोलकरांचे वडील मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन […]