राजा नेने यांनी आपल्या कामाची सुरवात प्रभात फिल्म कंपनी पासून केली. त्यांचा जन्म १८ सप्टेंबर १९१२ रोजी झाला. व्ही शांताराम यांनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडल्यावर दामले-फत्तेलाल यांचे सहकारी दिग्दर्शक राजा नेने यांनी रामशास्त्री चित्रपट हा हिंदी-मराठी दिग्दर्शित केला. रामशास्त्री अर्धा तयार झाल्यावर राजा नेने यांनी १९४३ नोव्हेंबरमध्ये प्रभात कंपनी सोडली. नंतर राजा नेने यांनी पहिली तारीख या […]
………ही सरांची स्तुती नव्हे, ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावं’ असं म्हणून प्रेमासोबत जगाला ज्ञानही अर्पावं हाच ‘धर्म’ म्हणून कार्य करणाऱ्या सरांना आणि सरांसारख्या इतर काही शिंक्षकांना मी एक विद्यार्थी (त्यांचा प्रत्यक्ष विद्यार्थी नसलो तरी अप्रत्यक्ष आहे.) या नात्याने अर्पण केलेली गुरुदक्षिणा.. […]
ज्या ग्वाल्हेर घराण्याची परंपरा ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशीद खाँ यांनी चालवली, ते घराणे म्हणजे गायन सादर करण्याची शैली ही भारतीय अभिजात संगीतातील नोंद असलेली पहिली शैली. अनेक प्रतिभावंतांनी त्या शैलीमध्ये मोलाची भर घातली, ती प्रवाही ठेवली आणि तिचे अस्तित्व कायम ठेवण्यास मदत केली. […]
भारतीय चित्रपट सृष्टीतील गाणी आपल्या सतार वादनाने अजरामर करणारे सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजेच ज्येष्ठ सतारवादक उस्ताद अब्दुल हालीम जाफर खान. उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांच्यासाठी सतार ही त्यांची सखी होती, प्रेयसी होती आणि प्रेयसही होती. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही ते अगदी सामान्य जीवन जगले. […]
राजधानी दिल्लीतील न्यायालयीन वर्तुळात ओ पी सैनी यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. मजबूत शरीरयष्टीचे सैनी हे मूळचे हरयाणाचे. न्यायपालिकेत येण्यापूर्वी ते दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक होते. १९८७ मध्ये न्यायदंडाधिकारी पदासाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेत तेव्हा अनेक उमेदवार बसले होते. पोलीस दलातून फक्त एकच जण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला. ते होते अर्थात ओ पी सैनी! […]
विविध भारतीवर पहील्या गाण्याची सुरवात संगीतकार अनिल विश्वास यांनी नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेल्या गाण्याने झाली. ज्या नरेंद्र शर्मा यांनी ज्योती कलश छलके हे गाणे लिहिले त्याच नरेंद्र शर्मा यांनी सत्यम शिवम सुन्दरम या चित्रपटातील सत्यम शिवम सुन्दरम हे गाणं लिहिले होते. पं. नरेन्द्र शर्मा यांनी लिहिले स्वागतम हे गाणं १९८२ च्या एशियाड मध्ये स्वागत गीत म्हणून निवडलेले होते. याचे संगीत पं. रविशंकर यांनी दिले होते. […]
भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८९६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली येथे झाला. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी नानासाहेब मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, […]
ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘मी…मिठाची बाहुली’ या आत्मचरित्राने साहित्यविश्वात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या लेखिका वंदना मिश्र म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुशीलाबाई लोटलीकर. मराठी, गुजराथी आणि मारवाडी रंगभूमीवरचे १९४० च्या सुमारास एक नावाजलेले व्यक्तिमत्व. […]