लौकिक अर्थाने म्हणाल, तर शालेय शिक्षण नाही, व्यवसाय भिक्षुकीचा. वास्तव अगदी आडखेड्यात. त्यांचा जन्म ८ जुलै १९२८ रोजी वाडा, सिंधुदुर्ग येथे झाला.पण पंचेचाळीस र्वष निष्ठेने साहित्यसेवा, चोपन्न कादंब-या, तेराशे कथा अशी थक्क करणारी कामगिरी करणारे लेखक म्हणजे श्रीपाद काळे. वडिलांचा पारंपरिक भिक्षुकीचा व्यवसाय त्यांनी निष्ठेने सांभाळला. वडिलांनी घरीच भिक्षुकीचं प्राथमिक शिक्षण दिलं. मात्र, पुढील शिक्षण साता-याच्या […]
अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे बालपण मिरज इथेच गेले. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई आणि आई कमलाबाई यांच्याकडून. “चित्ताकर्ष’ ही त्यांची घरची नाटक मंडळी होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे कमलाबाई आपल्या मुलांना बरोबर घेऊन विविध नाटक कंपन्यांमधून […]
मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांचा जन्म २१ जुन १९७१ रोजी पुणे येथे झाला.तसेच ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण घेत असताना ‘स्वामी’ या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘राजवाडे अँड सन्स’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘रमा माधव’, ‘प्रेम […]
अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला. अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर […]
एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव अरुण सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. […]
कधीच प्रसिद्धीसाठी काम न करणारा अभिनेता म्हणून अरविंद स्वामी यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ जून १९७० रोजी झाला. कॉलेज करताना पॉकेटमनी म्हणून मॉडेलिंग करत असताना मणीरत्नम यांची नजर अरविंद स्वामी यांच्यावर पडली. मणिरत्नमच्या रोजा चित्रपटाच्या माध्यमातून अरविंद स्वामीने १९९२ मध्ये बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. आणि एका रात्रीत अरविंद स्वामी स्टार बनले. १९९५ मध्ये त्यांनी […]
प्रदर्शित तारीख १८ जून १९६४ राज कपूर ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये स्वत: राज कपूर, वैजयंतीमाला व राजेंद्र कुमार ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. संगमचे कथानक प्रेम त्रिकोणावर आधारित असून हा चित्रपट तब्बल ४ तासांचा आहे. संगम राज कपूर यांनी निर्मिती केलेला पहिलाच रंगीत चित्रपट होता. साने गुरुजींच्या ‘तीन मुले’ या कथेची साधारण कल्पना घेऊन […]
अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील तानसेनाच्या घराण्याशी थेट संबंध होता. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील पद्मविभूषण अल्लाउद्दीन खाँ हे त्या काळातील भारतीय संगीतातील एक अग्रणी व्यक्तित्व होते. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे वडील व काका फकीर अफताबुद्दीन यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला. बारा वर्षांहून अधिक काळ दिवसाला १८ तासांहून अधिक […]
मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल हे आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे झाला. मोतीलाल यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर मोतीलाल मुंबईला नौसेनेत जाण्यासाठी आले होते. पण काही कारणाने ते झाले नाही व हिंदी चित्रपट सृष्टीला एक भारदस्त नट मिळाला. १९३४ मध्ये […]