नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

तारकांचे जन्मरहस्य संशोधिणारा : डॉ गुरुराज वागळे

आकाश दर्शनाचे संस्कार जर शालेय वयात झाले तर या कुतुहलाचे रुपांतर जिज्ञासात होऊ शकते. तसे झाले तर खगोल शास्त्राचा अभ्यास करण्याचा ध्यास त्या विद्यार्थांना शालेय वर्षातच लागतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सरस्वती सेकंडरी स्कूलचा माजी विद्यार्थी डॉ. गुरुराज वागळे. […]

तरुणाईचा मोहर (अविष्कार) : डॉ. निरंजन करंदीकर

निरंजनचा Ph.D. चा संशोधनाचा हा विषय देशातील करोडो मधुमेही रुग्णांना दिलासा देणारा आहे. आज देशातील सात कोटी मधुमेह पिडीत लोकांचे डोळे, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका आहे. या आजारामुळे दरवर्षी असंख्य व्यक्ती बळी पडता आहेत. मधुमेह आजार शोधण्याचे प्रमुख साधन म्हणजे रक्तपेशी मधील ग्लूकोजची तपासणी करणे व ती मर्यादित ठेवणे. नवीन शोधांमुळे डोळ्यातील पाण्यासारखी इतर जैविकद्रव्ये यांची तपासणी करून ग्लूकोजची पातळी ओळखता येते. […]

वैद्यकिय संशोधनातील निती चिकित्सक – डॉ. प्रिया साताळकर

शालेय वर्षांपासून अभ्यासू म्हणून ओळख असलेल्या प्रियाचा संवेदेनशीलता हा स्थायी स्वभाव. जिज्ञासा संस्था गेली एकवीस वर्षे प्रकशित करत असलेल्या शालेय जिज्ञासा या नियतकालिकाची प्रिया ही प्रथम संपादिका. सरस्वती सेकंडरी स्कूलमधील ही हुषार विद्यार्थ्यांनी १९९५ साली शालांत परीक्षेत मुंबई विभागात गुणवत्ता यादीत आली होती. […]

आगीशी खेळणारा तंत्रज्ञ : डॉ. कुलभूषण जोशी

कुलभूषणचे सध्याचे कार्यक्षेत्र कोळसा, विविध ज्वलनशील वायू आणि इंधन यांचा निर्मिती क्षेत्रात वापर करतानाचे कारखान्याचे नियोजन आणि आराखडा तयार करणे आहे. आगीशी खेळू नकोस हा मराठमोळा सल्ला धुडकावून एक मराठी ठाणेकर तरूण खरोखरच प्रत्यक्ष आगीशी खेळून जागतिक पातळीवर ठाणे शहराचे नाव मोठे करीत आहे ही आपल्या सर्वांनाच अभिमानाची गोष्ट आहे. […]

पेशींच्या राज्यात रमणारी – डॉ. आसावरी कोर्डे – काळे

आज टयूमर नष्ट करण्यासाठी औषधे किंवा ऑपरेशन करावे लागते. हे काम पुढील काळात पेशीतील सूक्ष्म आरएनएच्या सहाय्याने अधिक कार्यक्षमतेने करता येईल. परंतु त्या अगोदर पेशींमधील या संपूर्ण यंत्रणेचा सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. आसावरीसारखे अनेक तरूण शास्त्रज्ञ यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. […]

अमृत ऊर्जा – डॉ. अमृता नवरंगे – जोशी

ऊर्जेचे नैसर्गिक स्त्रोत म्हणजे पाणी, कोळसा, जंगल, खनिज तेल आणि वायू यांचा साठा मानवाच्या उथळपट्टीने संपत आलेला आहे. तमाम मानव जातीला अपारंपारिक उर्जा स्त्राsतांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. उर्जा निर्मिती तिपटीने वाढवण्यासाठी अपारंपारिक उर्जेचा वापर प्रामुख्याने असणार आहे. अमृता सारख्या उर्जा क्षेत्रात काम करणाऱया तरूण संशोधकांना हे मोठे आव्हान आहे. मला खात्री आहे की हे आव्हान आपले तरूण संशोधक नक्कीच स्विकारतील. […]

सीमा हर्डिकर – जगू या स्वच्छंदे परि विज्ञाने

सीमा नुसती शेती विषयात पदवीधर झाली नाही तर विद्यापीठात पहिली आली. त्याबरोबच ती बाळासाहेब सावंत आणि सर रॉंबट अलन Robart Alan सुवर्णपदकाची मानकरी ठरली. कृषी विद्यापीठातली सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कुलपती पदक प्रदान करून तिच्या यशावर सुवर्ण कळस चढवला. […]

मराठी संगीतकार प्रभाकर पंडित

मराठी संगीतकार प्रभाकर पंडित यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी झाला. प्रभाकर पंडित यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले. संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे “मधुवंती व्हायोलिन विद्यालया”चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे […]

दत्त्या

काही माणसं किती विलक्षण, चमत्कारिक  असतात ना? ती लक्षात राहतात ती त्यांच्या गुणांमुळे नाही तर त्यांच्या चमत्कारिक वागण्यामुळेचं. मात्र ही जगाच्या दृष्टीने निरोपायागी, मुर्ख असतात. ‘दत्त्या’ हा अशांचपैकी एक.  […]

डॉ. सतीश धवन

डॉ. सतीश धवन यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२० रोजी श्रीनगरमध्ये झाला. धवन हे पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., १९४७ साली मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम. एस केले. […]

1 217 218 219 220 221 381
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..