चितामण गणेश कर्वे यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पुणे मध्ये तर उच्चशिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १८९४ रोजी झाला. गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठात त्यांनी बी. ए. पदवी मिळविली. १९१९ साली डॉ. केतकर यांच्या ज्ञानकोश प्रकल्पात ते काम करू लागले. डॉ. केतकरांसारख्या चतुरस्र, विद्वान, बुद्धिवंतांच्या सहवासात कोश संपादनाचे पहिले धडे कर्वे यांनी गिरविले आणि […]
त्यांच्या पुस्तकांमध्ये कोकणातील निसर्ग केंद्रस्थानी होता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३५ रोजी गुहागरमध्ये झाला. पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातून मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले होते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या त्या माजी अध्यक्षा आणि गेली सुमारे वीस वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहात होत्या. डॉ. दीक्षित यांनी ‘प्राचीन मराठी वाङ्मयातून दिसणारे स्त्री दर्शन’ या विषयावर पीएचडी प्राप्त केली होती. त्यांना चार […]
महान कथक गुरू, उत्कृष्ट गायक, निष्णात तबला, सरोद, व्हायोलिन वादक आणि उत्तम दर्जाचे चित्रकार असणाऱ्या पं. बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. पं बिरजू महाराज यांचे वडील म्हणजे लखनौच्या प्रसिद्ध कालका-बिंदादीन घराण्यातील अच्छन महाराज. त्याचे नाव खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा. बिरजू हे त्यांचे लहानपणचे नाव. आज आपण त्यांना आजही पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखतो. पं.बिरजू […]
जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजारांच्या यादीत कर्करोग महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. भारतात, कुठल्याही घडीला २५ लाख कर्करोगपीडित रुग्ण आढळतात, त्यात दरवर्षी आठ-नऊ लाख नवीन रुग्णांचे निदान होते. एका अहवालानुसार बालकांमध्ये कर्करोगाच्या प्रमाणात दरवर्षी मोठी वाढ होत आहे. कर्करोग हा एकच […]
के.आर. नारायणन हे राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे जन्माने दलित असणारे पहीले भारतीय नागरीक असले तरीही ते समस्त भारतीयांचे नेते अशीच त्यांची प्रतिमा होती, त्यातच त्यांचे मोठेपण होते. राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी आतापर्यंत केवळ समारंभाचे मानद पद म्हणजे राष्ट्रपती ही ओळख पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. […]
स्थापना : ४ फेब्रुवारी १७६८ भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली ‘मराठा लाइट इन्फंट्री’ ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला. […]
ग्लॅमर आणि फॅशनची उत्तम समज फार थोडय़ा कलाकारांना असते. नेहा पेंडसेचे नाव यामध्ये सर्वात वर घ्यावे लागेल. मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमर कॅरी करता येईल अशा मोजक्या अभिनेत्री आहेत. कॉस्च्यूमचा योग्य सेन्स असणं आणि ते तितक्याच सहजपणे कॅरी करणं हे इंडस्ट्रीतल्या फार मोजक्या कलाकारांना जमलं आहे. या कलाकारांच्या यादीतलं नेहा पेंडसे हे वरच्या यादीतलं नाव. ग्लॅमरस नेहा पेंडसेचं […]
मराठी साहित्यातील अनेक साहित्यकृतींना आपल्या चित्रांनी अधिक देखणेपण देणाऱ्या वसंत सरवटे यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. वसंत सरवटे यांचा जन्म कोल्हापूरचा. त्यांचे शालेय आणि सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरलाच झाले. त्यांना शाळेमध्ये असल्यापासून चित्र काढण्याची आवड होती. हस्तलिखितांमध्ये कविता, कथांसाठी चित्रे काढायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यातूनच पुढे त्यांची कारकीर्द घडली. पु.ल. देशपांडे, जयवंत दळवी, रमेश मंत्री […]
गाईड, प्यासा, चौदहवीं का चाँद, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, तीसरी कसम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी वहिदा रेहमान यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३६ रोजी तामिळनाडूतील चेंगलपेट येथे झाला. वहिदा रेहमान यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र नशीबाने त्या बॉलिवूडमध्ये आल्या. वहीदा रहमान यांनी आपल्या बहिणीसोबत भरतनाट्यमचे धडे गुरु त्रीचुंबर मिनाक्षी सुंदरम पिल्लई […]
द्रमुकचे संस्थापक, तमिळनाडूचे राजकारणी व मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई तथा कोंजीवरम नटराजन अण्णादुराई यांचा जन्म १५ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. तमिळ भाषेतील एक निष्णात लेखक असलेले अण्णादुराई आपल्या भाषणशैलीसाठी देखील प्रसिद्ध होते. पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराईंचा पेरियार ह्या द्रविडी चळवळकर्त्या नेत्यास पूर्ण पाठिंबा होता. अण्णादुराईंनी १९३७ साली पेरियारच्या द्रविडर कळघम ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. […]