नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

लेखक अच्युत गोडबोले

अर्थशात्र, संगीत, साहित्य, राजकारण, समाजशास्त्र आणि कम्प्युटरसारख्या क्षेत्रात सहजपणे मुशाफिरी करणारे अच्युत गोडबोले यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५० रोजी अंमळनेर येथे झाला. अच्युत गोडबोले यांनी विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे. अच्युत गोडबोले यांचे बालपण प्रमुख्याने सोलापूर शहरात गेले. शाळेत असताच त्यांनी विज्ञान आणि गणितात मोठे प्राविण्य मिळवले. दहावीच्या परीक्षेत ते […]

उस्ताद अमीर खॉं

अमीर खॉं यांचा महाराष्ट्रात जन्म झाला असला तरी त्यांचे बालपण मध्यप्रदेशात, इंदोरमधेच गेले. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१२ रोजी अकोला येथे झाला. आपल्या साठ वर्षाच्या आयुष्यातील चाळीस वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीतात घालवली आणि एका गायकीला जन्म दिला. त्या घराण्याचे नाव झाले “इंदोर घराणे“. अमीर अली यांचे पूर्वज हरियानातील कालनौर नावाच्या गावचे. ते तेथून इंदोरला येऊन स्थायिक […]

सुलोचना दीदीं

सुलोचनाबाई यांनी भालजी पेंढारकर यांना अगुरु मानले. रेखीव आणि बोलक्या डोळ्याच्या रंगू दिवाण यांचे नामकरण भालजींनी ‘ सुलोचना ‘ असे केले आणि ह्याच नावाने त्या खूप लोकप्रिय झाल्या. […]

बॉलिवुड मधील लोकप्रिय हास्य कलाकार जॉनी लिव्हर

जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाशराव जनुमाला. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी कनगिरी, आंध्र प्रदेश येथे झाला. आंध्रप्रदेशातील एका तेलगु ख्रिश्चन कुटुंबात जॉनी लिव्हर यांचा जन्म झाला. जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा यांच्या सोबत मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. ते […]

याहू स्टार शमशेरराज ऊर्फ शम्मी कपूर

शम्मी कपूर यांनी गंभीर भूमिका म्हणता येतील, तशा फारशा भूमिका केल्याच नाहीत. एक मस्त कलंदर, काहीसा खुशालचेंडू तरुण अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. पण प्रेक्षकांना जसे गंभीर भूमिका करणारे अभिनेते हवे असतात, तसेच जीवनावर ओसंडून प्रेम करणारे, आनंदी, मन प्रसन्न करणारे अभिनेतेही हवे असतात. जे आपल्याला आयुष्यात करणे शक्य नाही, […]

मराठी लेखक, नाटककार, पत्रकार जयवंत दळवी

जयवंत दळवी हे वेंगुर्ल्यापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील आरवली गावचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी गोव्यातील हडफडे गावी झाला. जवळच्या शिरोडे गावी त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईला आले आणि घरच्या दडपणामुळे मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. मध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी अभ्यास करू लागले. पण डिप्लोमा अर्धवट टाकून मुंबईच्या ‘प्रभात’ दैनिकात ते रुजू […]

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर

जेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ता, लेखक अशी ओळख असलेल्या कुलदीप नय्यर यांनी देशातल्या नामवंत वृत्तपत्रांसाठी लेखन केले होते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ रोजी पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये झाला. लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण आणि नंतर तेथील लॉ कॉलेजमधून त्यांनी एल.एल.बी.पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. वकिलीचे शिक्षण घेऊन भारतात परतलेले नय्यर यांनी क्लार्क न होण्याचा निश्चय केल्यामुळे त्यांना […]

भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव

जगातील सर्वोत्तम ऑलिम्पिक क्रीडा कुंभमेळ्यात भारताकरिता पहिले ऐतिहासिक वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये केला होता. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी झाला. महत्त्वाचे म्हणजे खाशाबाच्या पदकानंतर तब्बल ४४ वर्षे आपली वैयक्तिक पदकांची पाटी कोरी होती. कुस्तीतही पाच दशकांनंतर दुसरे पदक आले. फिनलंड देशाच्या राजधानीतील १५ व्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत […]

भारताचा खेळाडू प्रवीण अमरे

प्रवीण आम्रे हे १९९१ ते १९९४ भारतीय क्रिकेट संघाकडून खेळले. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीप्रमाणेच रमाकांत आचरेकरांचा शिष्य असलेल्या अमरेंची कारकीर्द फार मोठी ठरली नाही. ११ कसोटीत एका शतकासह ४२५ धावा त्यांनी केल्या. ३७ वनडे खेळताना मात्र प्रवीण अमरे यांना शतक ठोकता आले नाही. आय.पी.एल.मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रशिक्षक म्हणून […]

1 122 123 124 125 126 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..