हंपी आणि बदामी ही दोन वैभवशाली गावं आपल्या असामान्य वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेसाठी गेली शेकडो वर्ष दिगंत कीर्ती बाळगून आहेत. तुंगभद्रा नदीकाठावर वसलेलं ‘हंपी’ त्यावेळच्या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचं ठिकाण होतं. याच परिसरातला बदामीचा ‘वतापी’ गणरायही गेली शेकडो वर्ष भारतीय धार्मिक मनाला भावलेला आहे. ‘बदामी’ हे अगोदर ‘वतापी’ म्हणून ओळखली जायचं. परंपरेने वतापी गणेशाच्या ब-याच कथा सांगितल्या आहेत. […]
मलेशिया, गेंटींग, थायलंड, पटाया, सींगापूर ही आम्हा मध्यमवार्गीयांच्या स्वप्नातील वारी २००७ मधे उरकली आणि अंतरराष्ट्रीय प्रवासाला चटावलो. शारजा-दुबई तर द्वीवार्षिक वहीवाटीनी आमचीच वाटायला लागलीत. मधेमधे भारतातले बरेचसे भाग पहात पहात जवळपासचे भूतान वगैरेही पादाक्रांत केल. नवीन एखाद्या डेस्टीनेशनचा विचार करता करता, अजुन खूप जग बघायच राह्यल असल तरी अचानक सिकंदर सारखा उगाचच जग जिंकण्याच्या ईर्षेनी पेटुन उठलो आणि पत्नीला सरप्राइज देण्यासाठी आता युरोपवर स्वारी करायची असा मनसुबा जाहीर केला. […]
धर्मचक्रप्रवर्तनाचे स्थान – सारनाथ गौतम बुध्दाच्या जीवन प्रवासातील महत्त्वाचे स्थान म्हणजे सारनाथ.वाराणसीहून ९ किमी.अंतरावर आहे. हिंदु आणि बुध्द असे दोन महान धर्म 2500 वर्षापासून एकत्रीतपणे या परिसरात रूजले गेले आणि गुण्यागोविंदात त्यांची वाटचाल पुढे चालत राहिली. नेपाळच्या सीमेवरील लुंबीवन हे जन्मस्थान. बिहार मधील पाटलीपुत्र जवळील जागा ही त्याला झालेल्या साक्षात्काराची. मुख्य धर्मचक्रप्रवर्तनाचे स्थान सारनाथ कुसीनारा हे […]
त्या दिवशी मोठ्या रिक्षाने शिरोड्याहुन सकाळी निघायलाच नऊ वाजून गेले आणि वाटेत देव वेतोबा ..माऊली चं दर्शन घेऊन परुळे करीत भोगव्याला पोचायला जवळ जवळ दुपारचे बारा वाजले …. मी फार अस्वस्थ झालो .. कारण हा किनारा फार सुंदर आणि इथून दिसणारी विशाल समुद्राची निळाई … मला कॅमेऱ्यात टिपायची होती .. मला इथे नऊ वाजता पोचायचं होतं ..सकाळच्या […]
प्रवासाचं सुंदर देणं ….. बामणोली … वासोटा … नागेश्वर … चोरवणे… अविस्मरणीय ट्रेक) (हा फोटो वरंध घाट परिसरातला आहे … मागे जो मोठा डोंगर दिसतोय तो … वरंध घाटातला कावळा किल्ला … महाराजांनी याला फार सुंदर नाव दिलं … चंद्रगड … इथेच खाली स्वामी समर्थांची शिवथर घळ … सुंदर मठ आहे … सह्याद्रीचा हा परिसर पंचमहाभूतांचा […]
दरभंगा, गंगामहाल, सिंदीया, नेपाळ या घाटांची भव्यता व शिल्पकला डोळयात भरणारी. पुढे अहिल्याबाई होळकर, नागपूरकर भोसले, वैद्य अशा अनेक घाटांची मालिकाच आहे. प्रत्येकामागे इतिहास आहे. विष्णु, पार्वती, विनायक व अनेक देवतांची मंदिरे यांनी घाट सजलेला आहे. काशीचे घाट आणि रंगीबेरंगी छञ्या यांचे अतूट नाते आहे. छञ्यांच्या खाली पुरोहित व न्हावी आपली कर्मे मन लावून उरकत असतात. […]
चारेकशे वर्षांपूर्वी स्पॅनिश लोकांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ‘इंकापूर्व’ लोकांनी तलावाच्या पाण्यात तरंगती घरे बांधून अशा त-हेने आश्रय घेतला. पूर्वीची दोन-तीन हजार कुटुंबाची संख्या आता पाच सहाशे कुटुंबापर्यंत आली आहे. अशी अंदाजे साठ-पासष्ट तरंगती खेडी आहेत म्हणे लेक टिटिकाकामध्ये. सगळी दहा ते बारा फूट खोल पाण्यात. तोतोरा गवत वाळवून त्याचे भारे उलट सुलट एकमेकावर पसरून व भक्कम लाकडांच्या व दोरीच्या साहाय्याने बांधून तयार केलेल्या सहा ते आठ फूट जाडीच्या चटया म्हणजे ही तरंगती खेड्याची जमीन. ही खेडी साधारण तीस ते तीनशे चौ. मीटरपर्यंत कोणत्याही आकाराची. […]
बनारस, वाराणसी, काशी अशा तीन नावांनी सुप्रसिध्द असलेल्या या शहराची गणना जगातील अथेन्स, जेरूसेलेम, पेकींग अशा नामवंत शहरांच्या मालिकेत इतिहासकारांनी केली आहे. अडीच ते तीन हजार वर्षांच्या इतिहासाच्या आठवणी येथे आजही ताज्या आहेत.यवनांची शेकडोंनी आक्रमणे पचवीत बनारसने आपली हिंदु अस्मिता अबाधित राखली आहे. शंकराचार्य, तुलसीदास, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्या बरोबरीने बुध्द, महावीर अशा विविध धर्मांच्या संतांचे हे […]
या सूर्यास्ताला ‘मॅनहॅटनहेंज’ म्हटलं जातं. याला मॅनहॅटन सोल्स्टाईस असंही म्हटलं जातं. असा हा सूर्यास्त वर्षातून दोन वेळा होतो … मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात आणि जुलैच्या दुसऱ्या आठवडयात. अगदी असाच… वर्षातून दोन वेळा त्याच पॉईंटला सूर्योदय देखील होतो. […]
दक्षिण अमेरिकेची कुठलीही चित्रे पाहिलीत तरी माचूपिचूचे चित्र बघायला मिळणारच. किंबहुना माचूपिचूशिवाय दक्षिण अमेरिका ट्रीप पूर्ण होऊच शकत नाही म्हणा !त्यामुळे आमचा पुढचा टप्पा ’पेरू’.या देशातच इन्का संस्कृतीचे अवशेष असणारे माचूपिचू हे अत्यंत महत्त्वाचे स्थान.हे कुझ्कोपासून ८० किमी अंतरावर आहे त्यामुळे लीमा या राजधानीपेक्षा‘ इंन्कांची राजधानी कुझ्कोकडॆ’ आम्ही मोर्चा वळवला. […]