नवीन लेखन...

जगदगुरु आद्य शंकराचार्यांच्या विविध स्तोत्रांवर आधारित ही मालिका. विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले हे विशेष सदर…

श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – १

कदंबवनचारिणीं मुनिकदम्बकादंबिनीं, नितंबजितभूधरां सुरनितंबिनीसेविताम् | नवंबुरुहलोचनामभिनवांबुदश्यामलां, त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥१|| भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवती त्रिपुरसुंदरीचे उपासक होते. शाक्त संप्रदायात वर्णन केलेल्या दशमहाविद्यांपैकी हे सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे त्रिपुरसुंदरी. बाला, षोडशी,ललितांबा अशा विविध स्वरूपात तिचे पूजन केले जाते. या आपल्या आराध्य स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, कदंबवनचारिणीं- कदंब वृक्ष हा शाश्वताचे प्रतीक आहे. चिरंतन, सनातन शक्ती […]

मीनाक्षीस्तोत्रम् – ८

शब्दब्रह्ममयी चराचरमयी ज्योतिर्मयी वाङ्मयी नित्यानन्दमयी निरञ्जनमयी तत्त्वंमयी चिन्मयी । तत्त्वातीतमयी परात्परमयी मायामयी श्रीमयी सर्वैश्वर्यमयी सदाशिवमयी मां पाहि मीनाम्बिके ॥ ८ ॥ आई मीनाक्षीच्या तात्त्विक स्वरूपाचे शास्त्रीय वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, शब्दब्रह्ममयी- वेद शास्त्र यामध्ये असणाऱ्या शब्दांना शब्दब्रह्म असे म्हणतात. या सगळ्याच्या द्वारे जिचे वर्णन केल्या जाते अशी. चराचरमयी- चर म्हणजे सजीव तर अचर म्हणजे निर्जीव. या […]

मीनाक्षीस्तोत्रम् – ७

वीणानादनिमीलितार्धनयने विस्रस्तचूलीभरे ताम्बूलारुणपल्लवाधरयुते ताटङ्कहारान्विते । श्यामे चन्द्रकलावतंसकलिते कस्तूरिकाफालिके पूर्णे पूर्णकलाभिरामवदने मां पाहि मीनाम्बिके ॥ ७॥ आई जगदंबा मीनाक्षीच्या कलारसिक स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, वीणानादनिमीलितार्धनयने – वीणानादामुळे नेत्र अर्धवट मिटून घेतलेली. शरीरविज्ञान सांगते की आपल्याला प्राप्त होणाऱ्या संवेदनां पैकी ८३% संवेदना केवळ डोळ्यांनी प्राप्त होतात. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की अन्य कोणत्याही ज्ञानेंद्रियांनी […]

मीनाक्षीस्तोत्रम् – ६

नादे नारदतुम्बुराद्यविनुते नादान्तनादात्मिके नित्ये नीललतात्मिके निरुपमे नीवारशूकोपमे । कान्ते कामकले कदम्बनिलये कामेश्वराङ्कस्थिते मद्विद्ये मदभीष्टकल्पलतिके मां पाहि मीनाम्बिके ॥ ६ ॥ आई जगदंबेच्या वैभवाचे नवनवीन पैलू उलगडून दाखवताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, नादे- नाद अर्थात ओंकार स्वरूप असलेली. नारदतुम्बुराद्यविनुते- नारद, तुबरू इ. देवर्षी, गंधर्व इत्यादींच्याद्वारे वंदन केल्या गेलेली. नादान्तनादात्मिके- शास्त्रांमध्ये ओंकाराला नाद असे म्हणतात. त्यामध्ये अ,ऊ […]

मीनाक्षीस्तोत्रम् – ५

गन्धर्वामरयक्षपन्नगनुते गङ्गाधरालिङ्गिते गायत्रीगरुडासने कमलजे सुश्यामले सुस्थिते । खातीते खलदारुपावकशिखे खद्योतकोट्युज्ज्वले मन्त्राराधितदैवते मुनिसुते मां पाही मीनाम्बिके ॥ ५ ॥ आई जगदंबा मीनाक्षीच्या दिव्यतम वैभवाचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, गन्धर्व- स्वर्ग लोकांमध्ये गायन,वादन कलेत निपुण असणारे दिव्य कलाकार. अमर- स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या देवता. देवतांचे आयुर्मान अतिविशाल असल्याने आपल्या सापेक्षरीत्या ते मृत्यू पावत नसल्याने त्यांना […]

मीनाक्षीस्तोत्रम् – ४

ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते प्रेतासनान्तस्थिते पाशोदङ्कुशचापबाणकलिते बालेन्दुचूडाञ्चिते । बाले बालकुरङ्गलोलनयने बालार्ककोट्युज्ज्वले मुद्राराधितदैवते मुनिसुते मां पाहि मीनाम्बिके ॥ ४ ॥ आई जगदंबेच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते – ब्रह्म म्हणजे श्रीब्रह्मदेव, ईश म्हणजे श्रीशंकर तथा अच्युत म्हणजे श्रीविष्णू यांच्याद्वारे अखंड जिच्या चरित्राचे गायन केल्या जाते अशी. प्रेतासनान्तस्थिते- भगवान महाकाल निश्चल स्वरूपात स्थिर रहात […]

मीनाक्षीस्तोत्रम् – ३

कोटीराङ्गदरत्नकुण्डलधरे कोदण्डबाणाञ्चिते । शिञ्जन्नूपुरपादसारसमणीश्रीपादुकालंकृते मद्दारिद्र्यभुजंगगारुडखगे मां पाहि मीनाम्बिके ॥ ३॥ आई जगदंबेचे अद्भुत वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, कोटीराङ्गदरत्न- कोटी अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे, अत्यंत मौल्यवान रत्नांनी घडविलेले अंगद म्हणजे बाजूबंद, कुण्डलधरे- कुंडलांना धारण करणाऱ्या, कोदण्डबाणाञ्चिते- कोदंड अर्थात धनुष्य. हे भगवान विष्णूंच्या धनुष्याचे नाव. दंड अर्थात सत्ता. अधिकार. ज्यावर कोणाचाही दंड चालत नाही ते कोदंड. आई जगदंबेची […]

मीनाक्षीस्तोत्रम् – २

चक्रस्थेऽचपले चराचरजगन्नाथे जगत्पूजिते आर्तालीवरदे नताभयकरे वक्षोजभारान्विते । विद्ये वेदकलापमौलिविदिते विद्युल्लताविग्रहे मातः पूर्णसुधारसार्द्रहृदये मां पाहि मीनाम्बिके ॥ २ ॥ आई जगदंबा मीनाक्षीच्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, चक्रस्थे- आई जगदंबेचे यंत्र स्वरूप असणाऱ्या श्रीयंत्रा मध्ये निवास करणाऱ्या, अचपले- अतीव स्थिर. शांत. चंचलता अर्थात कृतीचा संबंध आहे काहीतरी प्राप्त करण्याशी. आपण तीच गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो जी […]

मीनाक्षीस्तोत्रम् – १

श्रीविद्यॆ शिववामभागनिलयॆ श्रीराजराजार्चितॆ श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ चिन्तामणीपीठिकॆ । श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ श्रीशांभवि श्रीशिवॆ मध्याह्नॆ मलयध्वजाधिपसुतॆ मां पाहि मीनाम्बिकॆ ॥ १ ॥ भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी मीनाक्षी पंचरत्नम् सोबतच मीनाक्षी स्तोत्रम् या नावाची ही एक नितांत सुंदर रचना साकारली आहे. यात आई मीनाक्षीचे वैभव वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात, श्रीविद्यॆ- शाक्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्रीविद्या स्वरुपिणी. शिववामभागनिलयॆ- भगवान शंकरांच्या डाव्या […]

नवरत्नमालिका – ६

वारणाननमयूरवाहमुखदाहवारणपयोधरां चारणादिसुरसुन्दरीचिकुरशेखरीकृतपदाम्बुजाम् । कारणाधिपतिपञ्चकप्रकृतिकारणप्रथममातृकां वारणान्तमुखपारणां मनसि भावयामि परदेवताम् ॥ ६॥ कोणत्याही स्त्रीचे खरे वैभव म्हणजे तिचे मातृवात्सल्य. जगज्जननी आई जगदंबेच्या त्याच मातृवात्सल्याचा आधार करीत, तिचे वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात, वारणानन – वारण शब्दाचा एक अर्थ आहे हत्ती. त्याचे आनन म्हणजे मुख. तसे ज्यांचे मुखकमल आहेत ते भगवान गजानन. मयूरवाह- मयूर हे ज्यांचे वाहन आहे असे. अर्थात […]

1 21 22 23 24 25 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..