नवीन लेखन...

जगदगुरु आद्य शंकराचार्यांच्या विविध स्तोत्रांवर आधारित ही मालिका. विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले हे विशेष सदर…

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३

स्वशक्त्यादिशक्त्यंत सिंहासनस्थं मनोहारि सर्वांगरत्नोरुभूषम् | जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं पराशक्तिमित्रं नमः पंचवक्त्रम् ‖ ३ ‖ भगवान श्री शंकरांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, स्वशक्त्यादिशक्त्यंतसिंहासनस्थं- स्वतःची शक्ती अर्थात चैतन्यसत्ता असणाऱ्या आदिशक्ती परांबेच्या सोबत भगवान शंकर आपल्या सिंहासनावर आरूढ असतात. आचार्यश्री या सिंहासनाकरिता शक्त्यंतसिंहासन असा शब्दप्रयोग करतात. याचा अर्थ ज्यांच्यावर कोणाची शक्ती चालत नाही. कोणाची सत्ता चालत […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २

अनाद्यंतमाद्यं परं तत्त्वमर्थं चिदाकारमेकं तुरीयं त्वमेयम् | हरिब्रह्ममृग्यं परब्रह्मरूपं मनोवागतीतं महःशैवमीडे ‖ २ ‖ कैलासनाथ भगवान शंकरांच्या या नितांत रमणीय स्तोत्रात त्यांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, अनाद्यंतम्- जे अनादि तत्त्व आहे. जे अनंत आहे. अर्थात ना ज्यांना आदी आहे ना अंत आहे. जे आहेतच आहेत. परम सनातन शाश्वत आहेत. आद्यं – […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १

गलद्दानगंडं मिलद्भृंगषंडं चलच्चारुशुंडं जगत्त्राणशौंडम् | कनद्दंतकांडं विपद्भंगचंडं शिवप्रेमपिंडं भजे वक्रतुंडम् ‖ १ ‖ भगवान श्री गणेशांच्या स्तुतीने, वंदनाने पवित्र कार्याचा आरंभ करावा या भारतीय संस्कृतीच्या परिपाठाचा प्रमाणे भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या श्री शिवभुजंगम् स्तोत्राच्या आरंभी श्री गणेश वंदनाने मंगलाचरण साधत आहेत. कसे आहेत हे भगवान गणेश? गलद्दानगंडं- ज्यांच्या गंडस्थळातून आत्मज्ञानरूपी मद सदैव ओसंडून वाहत […]

श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ८

पुरम्दरपुरंध्रिकां चिकुरबंधसैरंध्रिकां , पितामहपतिव्रतां पटुपटीरचर्चारताम्‌ | मुकुंदरमणीं मणिलसदलंक्रियाकारिणीं, भजामि भुवनांबिकां सुरवधूटिकाचेटिकाम् ॥८॥ पृथ्वीवर जेव्हा एखादी स्त्री सम्राज्ञी पदावर आरूढ होते त्यावेळी इतर मांडलिक राजांच्या राण्या तिची दासी स्वरूपात सेवा करतात. आई जगदंबा त्रिपुरसुंदरी या अनंतकोटी ब्रह्मांडांची सम्राज्ञी असल्याने तिच्या सेवेला उपस्थित असणाऱ्या अलौकिक दैवी शक्तींचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, पुरंदरपुरंध्रिकां चिकुरबंधसैरंध्रिकां – पुरंदर […]

श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ७

सकुंकुमविलेपनामलकचुंबिकस्तूरिकां , समंदहसितेक्षणां सशरचापपाशांकुशाम् | अशेषजनमोहिनीमरूणमाल्यभूषाम्बराम्, जपाकुसुमभासुरां जपविधौ स्मराम्यम्बिकाम ॥७|| भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज जगदंबेचे स्मरण करताना कोणत्या स्वरूपाचे ध्यान करतात त्याचे वर्णन करताना ते म्हणतात, सकुंकुमविलेपनाम्- कुंकुमासह अंगलेपन केलेली. आई जगदंबेने शरीराला चंदनाचा लेप लावलेला आहे. मस्तकावर हळदीचा लेप लावलेला असून त्यावर कुंकुमतिलक धारण केलेला आहे. अलकचुंबिकस्तूरिकाम् – अलक म्हणजे केसांमध्ये अर्थात भांगात कस्तुरी […]

श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ६

स्मरेत्प्रथमपुष्पिणीं रुधिरबिन्दुनीलांबरां, गृहीतमधुपात्रिकां मधुविघूर्णनेत्रांचलाम्‌ | घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां, त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥६|| आचार्यश्री तथा भारतीय संस्कृतीच्या एका वेगळ्याच वैज्ञानिकतेने थक्क करणारा हा श्लोक. स्मरेत्प्रथमपुष्पिणीं- या त्रिभुवन स्वरूप लतेवर आलेले पहिले पुष्प असणाऱ्या जगदंबेचे स्मरण करावे. रुधिरबिन्दुनीलांबरां- रक्त बिंदू प्रमाणे निल वस्त्र धारण केलेली. प्रथम क्षणी आपल्याला हे वर्णन विचित्र वाटेल. पण त्यामागे फार मोठे वैज्ञानिक सत्य आहे. […]

श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ५

कुचांचितविपंचिकां कुटिलकुंतलालंकृतां , कुशेशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वेषिणीम् | मदारुणविलोचनां मनसिजारिसंमोहिनीं , मतंगमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रये ॥५|| पूज्यपाद आचार्यश्रींची प्रतिभा इतकी अलौकिक आहे की ते सहज बोलत जातात आणि अलंकार आपोआप प्रगट होतात. आता याच श्लोकात पहा, प्रथम दोन्ही चरणाच्या प्रत्येक शब्दाच्या आरंभी क आणि पुढील दोन चरणांच्या प्रत्येक शब्दाच्या आरंभी म अक्षराने किती सुंदर अनुप्रास साधला आहे? कुचांचितविपंचिकां- मंडळाच्या मध्यभागी […]

श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ४

कदंबवनमध्यगां कनकमंडलोपस्थितां, षडंबरुहवासिनीं सततसिद्धसौदामिनीम् | विडम्बितजपारुचिं विकचचंद्रचूडामणिं , त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥४|| महाविद्या श्री त्रिपुरसुंदरीचे अतुलनीय वैभव सांगतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात, कदंबवनमध्यगां- कदंब वृक्षाच्या अर्थात कल्पवृक्षांच्या वनामध्ये निवास करणारी. कनकमंडलोपस्थितां- कनक अर्थात सोन्यापासून मंडल म्हणजे वर्तुळाकार आसनावर विराजमान असणारी. मंडल हे पूर्णत्वाचे, अखंडत्वाचे प्रतीक आहे. वर्तुळ ज्या बिंदूपासून आरंभ होते त्याच बिंदूवर समाप्त होते. स्वतःतच परिपूर्ण असणे […]

श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ३

कदंबवनशालया कुचभरोल्लसन्मालया, कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया | मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया , कयापि घननीलया कवचिता वयं लीलया ॥३|| श्रीविद्या, श्रीकामेश्वरी, श्रीराजराजेश्वरी अशा विविध नावांनी शास्त्र जिची आराधना करते अशा आई जगदंबा त्रिपुरसुंदरी चे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, कदंबवनशालया- कदंब वृक्षाच्या फांद्यांनी निर्माण केलेल्या घरात निवास करणारी. कदंब वृक्ष हा शाश्वताचे, चिरंतनाचे प्रतीक. त्यामुळे आईच्या चिरंतनत्वांचा विचार […]

श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – २

कदंबवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं, महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणींम् | दया विभव कारिणी विशदरोचनाचारिणी, त्रिलोचन कुटुम्बिनी त्रिपुर सुंदरी माश्रये ॥२|| परांबा त्रिपुरसुंदरीच्या अलौकिक वैभवाला विशद करताना आचार्यश्री म्हणतात, कदंबवनवासिनीं- कदंब वृक्षाला स्वर्गीय वृक्ष, कल्पवृक्ष असे म्हणतात. अशा वृक्षांच्या वनामध्ये निवास करणारी. कल्पवृक्षाच्या वनातच निवास केल्यावर कोणतीही इच्छा क्षणात पूर्ण होणार. मग उरलेल्या वेळेचे करायचे काय? तर शास्त्र सांगते साहित्य संगीत आणि […]

1 20 21 22 23 24 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..