नवीन लेखन...

लग्न म्हणजे काय असतं ?

लग्न म्हणजे काय असतं ? एक चुकलेलं गणित असतं कारण तिथे एक आणि एक तीन असतं… लग्न म्हणजे काय असतं ? उगाच त्याग करणं असतं कारण त्यातून काहीतरीमिळवायचं असतं लग्न म्हणजे काय असतं ? दोन जीवांचं मिलन असतं कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं लग्न म्हणजे काय असतं ? मोक्षाकडे नेणारं दार असतं कारण ते […]

तू भेटलीस की…

तू भेटलीस की का बेचैन होते वेडे मन माझे… तू भेटलीस की का होतात डोळे ओलेचिंब माझे… तू भेटलीस की का काळीज होते कासाविस माझे… तू भेटलीस की का व्यर्थच भासे हे जीवन माझे… तू भेटलीस की का बेभान होते सारेच ग माझे… © कवी – निलेश बामणे

झोपडी ते टॉवर

माझ्या झोपडीच्या जागी झाला टॉवर अन्‍ वाढली आता माझी पॉवर… लिफ्टने आता मी होणार लिफ्ट गरिबीतून श्रीमंतीत अचानक झालो शिफ्ट… टॉयलेटमधे मी आता बसणार इंग्लिश इंग्रजीबद्दल मनात नाही आता किल्मिश… चुरगळले कपडे आता होणार हद्दपार सुटबुट भरजरी आता अंगावर चढणार… एस.आर.ए. ने केले झोपडपट्टीचे टॉवर मलाही दिले माझ्या स्वप्नातील शॉवर… मुंबई होणार आता झोपडी मुक्त उरलेल्या […]

भोक

तुझ्या भिंतीवर मारला खिळा आणि पडला भोक तिला… त्या भोकातून पाहिले तुला पण दिसला चंद्र मला… त्या भोकाला लावला डोळा तेंव्हा दिसला काळोख मला… त्या भोकातूनच मग भिडला तुझ्या डोळ्याला माझा डोळा… त्या भोकातून पाहिले तुला तुही मग पाहिले मला… त्या भोकावर टांगले मला तुही मग टांगलेस तुला… त्या भोकातून दिले तुला तुही दिले प्रेम मला… […]

थोबडा

तुझा थोबडा पाहून मी तुझ्या प्रेमात पडलोच नाही तुला पाहून माझ्या हृद्याचे ठोके चुकले पहिल्यांदाच… मला वाटते तुझे आणि माझे काही नाते असावे गतजन्मीचे पण ते नाते प्रेमाचे नाही तर कदाचित असावे शत्रूत्वाचेच कारण क्षणात माणसांना भुरळ घालणार्‍या मला तुझ्या मागे उगाचच धावत राहावे लागलेच नसते वर्षानुवर्षे वेड्यागत… © कवी – निलेश बामणे (एन.डी.)

स्त्री – पुरुष

स्त्री – पुरूष हेएकमेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू मग त्यांच्या आकर्षणावरचपश्नचिन्ह का निर्माण होते बरे… स्त्रीने अंगप्रदर्शनकरावे आणि पुरुषाने त्याकडे आकर्षित होऊ नये म्ह्णजे पुरुषाच्या पुरुषत्वालाकुलूप लावणे नव्हे बरे… परुाषाने स्त्रीकडेपाहताना तिच्यात आई, बहीण, मुलगी पाहावी आणि स्त्रीने पुरुषाकडेपाहताना… न बोललेले बरे… स्त्रीला पुरुषाच्याज्याचे आकर्षण ते तो उगडे ठेऊ शकत नाही हे त्याचे दूर्दैव आणि स्त्रीच्याडोक्यावरील केसापासून पायाच्या […]

बदनाम

सितेसाठीच रामालाही आज बदनाम केले आहे श्रीकृष्णाला गोपिकांनीच आज बदनाम केले आहे लक्ष्मीनेच तर सरस्वतीसही आज बदनाम केले आहे महाभारता द्रोपदीनेच आज बदनाम केले आहे देवांनाही इंद्राने त्या आज बदनाम केले आहे कलियुगाने माणसालाच आज बदनाम केले आहे ©निलेश बामणे

पाऊस

दुष्काळानंतरचा पाऊसगारवा देणारा असतो, प्रेयसीने प्रियकराच्याजखमेवर प्रेमाने फुंकर घालावी तसा… तापलेली जमिन पावसानेथंड झाल्यावर आनंदाने हिरवा शालू नेसते, साखरपुड्यात नववधू नेसतेतसा… सृष्टीचे हे बदलेले रूपशेतकरी डोळेभरून पाहातो, प्रियकर आपल्याप्रेयसीचे अप्रतीम सौंदर्य चोरून पाहातो तसा… शेतकर्‍याच्यास्वप्नांना पावसात नवीन पालवी फुटून तो आनंदी होतो, प्रेयसीशीच लग्नठरल्यावर प्रियकर होतो तसा… ©निलेश बामणे

घड्याळ

घड्याळ होते भिंतीवरती टिक टिक करुन चाले सतत दिसली चाल काट्यांची एकाच दिशेने हाले   धावत होता एक तुरु तरु दुजा हळूच धांवे छोटा जाड्या मंद असून पळणे ना ठावे   पळत असती पुढे पुढे समज देती काळ-वेळेचा किती राहीला शिलकीमध्ये प्रवास आपुला जीवनाचा   जीवन चक्रापरि फिरती घड्याळ्यामधले सारे काटे जाणीव करुन देती सतत आपण […]

बलात्कार…

बलात्काराच्या बातम्या वाचल्या की लाज वाटते … आपण पुरुष असल्याची… त्या षंढांमुळे पुरुष बदनाम होतो… प्रत्येक पुरुष स्त्रियांच्या नजरेत दोषी दिसतो… प्रत्येक पुरुष लबाड असतो पण षंढ नसतो… तिच्या रक्षणासाठी कित्येकदा तो आपल्या प्रणाचीही बाजी लावतो… ती मिळविण्यासाठी असतानाही तिला मिळविण्याचा प्रयत्न करतो… तिला पाहून पुरुष उत्तेजित होतही असेल पण बेभान होतोच असे नाही… पुरुषाच्या मिठीत […]

1 304 305 306 307 308 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..