नवीन लेखन...

झगडणारे जीवन

गर्भामधूनी बाहेर पडतां,  स्वतंत्र जीवन मिळे  । जीवन रस हा शोषित होती,  आजवरी त्याची मुळे  ।। निघून गेला पदर मायेचा,  डोईवरूनी त्याचा  । झेप घेयी तो आज एकला,  पोकळीत नभाच्या  ।। दु:ख क्लेशाचे वार झेलले,  कुणीतरी त्याचेसाठीं  । आज दुवा नसता  सारे पडती पाठी  ।। तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे  । वंशाने जे […]

आनंद घट

देहमनाचा आनंद औरची,  नसे तयाला दुजी कल्पना  । जीवनामधले मिळता सारे,  उरे न तेथे कसली तुलना  ।। आनंदाचा घट भरूनी हा,  तन मन देयी पिण्यासाठी  । आनंदाला नसे सीमा मग,  अनेक घट अन् अनेक पाठी  ।। एक घटातूनी आनंद मिळता,  दुजे घट हे जाती विसरूनी  । अनेक घटांतील आनंद हा,  लूटाल कसा तृप्त होवूनी  ।। दुजामध्ये […]

वेडी

रस्त्यावरती उभी राहूनी,  हातवारे ती करित होती मध्येच हसते केंव्हां रडते,  चकरा मारीत बसे खालती…१, गर्दी जमली खूप बघ्यांची,  कुत्सीतपणे न्याहळू लागली, ‘शिपाई आणा जावूनी कुणी’,  ठाण्यात नेण्यास सांगू लागली…२ जीवनातील दु:खी चटका,  सहनशक्तीचा अंत पाहतो, मनावरील तो ताबा सुटूनी,  वेडेपणा हा दिसून येतो…३ इतकी गर्दी जमून कुणीही,  तिच्या मनीचा ठाव न जाणला रूख रुख वाटली […]

आरसा

दाखवितोस हूबेहूब रुप आरशामध्ये मला मीच माझे रुप बघूनी चमत्कार वाटला सत्य स्थितीचे द्दष्य करुनी दाखविलेस सर्वाला उणें अधिक न करितां तसाच दिसे आम्हाला गुणदोष बघूनी देहाचे मुल्य मापन करितो आम्हीं चांगले राहण्या शिकवी हीच युक्ती नामी कांचेच्या आरशापरीं असे मनाचा अरसा आत्म्याची मलीनता दाखवुनी चांगला बनवी माणसा — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com  

जादूगार तूं देवा

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   ।।धृ।। ढग काळे काळे जमवितोस सगळे गर्जती वादळे कडाडूनी विजा,  पर्जन्य होई भयंकर   ।।१।। जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार तळपते ऊन दग्ध होई जीवन जाई वाळून तेज वाढूनी सूर्याचे,  दाह करी फार   ।।२।। जादूगार तूं देवा,  दाखवी […]

काव्य कलश

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा, उपसतो जरी सतत,  होत नसे निचरा….१, गोड पाणी शब्दांचे,  ओठी अमृत वाटे, पेला भरता काठोकाठ,  काव्य हृदयी उमटे….२, पेला पेला जमवूनी,  कलश भरून आला, नाहून जाता त्यात,  देह भान विसरला….३, सांडता पाणी वाहे,  पसरते चोहीकडे, आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे….४ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

जीवन आनंद

ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे,  ध्येय कोणते खरे  । उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे  ।। संतसाधू आणि ज्ञानीजन,  बहूत ते झाले  । समाधानी परि एक मताचे,  उत्तर नाही दिले  ।। खेळखेळणे उड्या मारणे,  अन् खाणे पिणे  । बालपणीच्या आनंदाला,  नव्हते काही उणे  ।। विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो  । यौवनाच्या उंबरठ्यावरी,  बहरून […]

अनुभव

सुख दुःखाच्या लाटेमध्ये, तरणे वा बुडणे, जगेल तो त्या क्षणी, ज्याला माहित पोहणे ।।१।। पोहणे जगणे कला असूनी, अनुभव हा शिकवूनी जातो, जागरुकतेने कसे जगता, यशही त्याला तसेच देतो ।।२।। जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या, कष्ट लागती महान, परि केवळ एक अनुभवी प्रसंग, सारे देतो मिळवून ।।३।। अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे, निसर्ग शिकवी क्षणोक्षणी, सतर्कतेने वेचून घ्यावे, दैनंदिनीच्या […]

रामाची व्याकूळता

सीतेकरीता व्याकुळ झाला अवतारी चक्रपाणी, अजब ही रामप्रभू कहाणी  ।।धृ।। पत्नीहट्ट त्याला सांगे, कांचनमृग शोभेल अंगे, मृगयेच्या तो गेला मागे प्रसंग घेई रावण साधूनी  ।।१।। अजब ही रामप्रभू कहाणी रावण नेई पळवूनी सीता दिसेना रामा कोठे आता तरुवेलींना पुसत होता वाहत होते अश्रू नयनीं   ।।२।। अजब ही रामप्रभू कहाणी वाणी ज्याच्या शक्ती शिवाची ह्रदयामाजी दया सागराची […]

निसर्गाचे चक्र

सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे  ।।धृ।। एक एक पाकळी लहानशी कळी जाई उमलून फूल त्याचे बनून सुगंधी टपोरे फूल कांही वेळ राहील कोमेजून जाई देऊनी रुप बीजाचे परत अंकूरण होई दुजा एका झाडाचे  ।।१।। सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे एक एक पाऊल टाकते मुल वाढते हसून बनते यौवन एटदार तो दहधारी […]

1 285 286 287 288 289 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..