नवीन लेखन...

पचास साल की आयु

पचास साल हुए जिंदगीके,  गोल्डन ज्युबली मनायी गयी  । हंगामा और जल्लोष मे,  पूरा दिन पूरी रात गयी  ।। सारे बच्चे और रिश्तेदार,  जमा हुए इकठ्ठा  । फिर पडोसवाले क्यूं रहेंगे पिच्छे,  जब खानेको था मिठा  ।। सबने तारिफ की पचास साल, जिंदगी के ऊपर  । हम तो बहूत खुष हुए सुनकर, उसे पहीली बार  ।। […]

कायम मनीं वसावा विठ्ठल

ध्यावा गानिं दिसावा विठ्ठल कायम मनीं वसावा विठ्ठल  ।। नच जाणत मी निर्गुण ब्रह्मा मजला केवळ ठावा विठ्ठल  ।। जगतीं ऊन नि खड्डे काटे वाटेवरी विसावा विठ्ठल  ।। अंध पुरा मी, मार्ग दिसेना तडफड ही – कवळावा विठ्ठल  ।। थांबायाचें जेव्हां हृदया तेव्हां मुखीं असावा विठ्ठल  ।। सुभाष स. नाईक Subhash S. Naik

वाट पंढरिची पावन ही

पुण्यनगर पंढरीला घेउनिया जाई वाट पंढरिची पावन ही  ।। चालतात पाय रस्ता, नेत्र पंढरीकडे दूर जरी देह, पोचें हृदय विठ्ठलापुढे भक्त-देव यांच्यांमध्ये अंतरची नाहीं  ।। सोडुन आलो मागुती  घर, कुटुंबां जरी चिंता निज-संसाराची नसे अम्हांला परी ठावें, विठुराया आमुचा भार सदा वाही ।। प्रिय अति ही वाट, प्रिय अन् पंढरिचा-ध्यास पंढरिचा नाथ व्यापी अस्तित्व नि श्वास […]

समुद्र

समुद्राला अनुभवण्यासाठी त्याच्या कुशीत शिरावे लागते समुद्राची खोली मोजण्यासाठी त्याच्या तळाशी जावे लागते समुद्राची लांबी रुंदी कळण्यासाठी जगाची सफर करावी लागते समुद्रांचे रंग समजण्यासाठी त्याच्या जुनियेत जगावे लागते समुद्राची गोडी अनुभवण्यासाठी त्यावर प्रेम करावे लागते समुद्रांच्या लाटांवर स्वार होण्यासाठी अभ्यास, अनुभव आणि धाडस असावे लागते चक्रीवादळात अडकणार्यांना समुद्र मंथनाचा अनुभवातून अमृत विष आणि तत्नांची ओळख पटते […]

तिचा पहिला नंबर

आदले दिवशी येऊनी,  तिजला अभिनंदन दिले पास झालीस सांगुनी,  मित्रांनी पेढे मागितले हास्यवदन करुनी,  साखर हातीं दिली हाती मिळतां निकाल,  पेढे देईन वदली आंत जाऊनी खोलीमध्यें,  बंद केले दार दुःख आवेग येऊनी,  रडली ती फार वरचा मिळेल नंबर,  तिजला होती आशा रात्र रात्र जागूनही,  मिळाली तिज निराशा खूप कष्ट करुनी,  अपयश येता पदरीं दुःख तया सारखे,  […]

सौंदर्य दृष्टी

कां मजला ही सुंदर वाटते ?  दृष्टी माझी वा सौंदर्य तिचे ? कोण हे ठरवी निश्चीत,  मजला काही न कळते असेल जाण सौंदर्याची तर,  दिसेल सर्वच सुंदर नयनी तिच एक कशी असेल सुंदर,  जग सारेच असतां सुंदर सौंदर्याची दृष्टी नाहीं,  म्हणून सौंदर्य एखाद्यांत पाही पूर्वग्रह दुषित असते,  तेच सौंदर्याचे परिणाम ठरते मला जे भासते सुंदर,  दुजास […]

दुष्टाचा मृत्यु

सारे दुर्गुण अंगी असूनी,  गुंड होता तो इतर जनांना त्रास देत,  तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां,  फार मातला आया बहिणीना अपमानुनी,  त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने,  सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला,  दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती,  दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर,  खाली कोसळली […]

ये जवळ बस

‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं, मी बसलोही क्षीण तुझा कर करीं घेउनी सुखावलोही . नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू काय व्हायचें होतें ‘उद्या’च येथुन कायमचें तुज दूर ज़ायचें होतें. – सुभाष स. नाईक

वास्तव आणि स्वप्न

स्वप्नातही बघताना ज्याची भीती वाटते ते वास्तव असते  वास्तव आणि स्वप्न एकाच नाण्याच्या दोन बाजू एक चमकते दुसरे भासते वास्तव आणि स्वप्न दोन विरुद्ध गोष्टी एक खरी दुसरं खोटी वास्तवात जगायला हिम्मत लागते स्वप्नातही वास्तव नकोसे वाटते स्वप्नात मन स्वैर होते वास्तवात मन बंदिवान होते   स्वप्नात कल्पनांचे डोंगर रचले जातात वास्तवात ते सर्व कोसळतात   […]

दिन दिन दिवाळी…!

दिन दिन दिवाळी शब्द कानी पडती आली आली दिवाळी ! खमंग रुचकर स्वाद काय पदार्थांच्या लगबगी बनविण्या गृहिणी सजती ! नटण्याची हौस किती चारचौघीत उठून दिसण्या पैठणी झुलती अंगावरी ! मुलींची लगबग रांगोळीसाठी तर्हे तर्हेचे रंग किती? रंगसंगती किचकट भारी ! घाई कंदिलासाठी मुलांची पंचकोनी का षटकोनी पारंपरिकच बरा दिसे ! गोवत्स द्वादशी दिन गोवत्साचे पूजन […]

1 283 284 285 286 287 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..