मराठी आणि महाराष्ट्राविषयक बातम्या आणि घडामोडी…

गॉडफादरच्या शोधात…

सध्या राज्याच्या राजकारणात गॉडफादरची चर्चा रंगली आहे. चित्रसृष्टीत गॉडफादर असल्याशिवाय काम होत नाही हे माहीत होते पण, राजकारणात ही त्रुटी तीव’तेने जाणवत असेल असे वाटले नव्हते. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ही गरज नुकतीच बोलून दाखवली आणि राज्याची राजकीय पृष्ठभूमी चांगलीच थरथरली.
[…]

लढा दारिद्र्य हटवण्यासाठी

जगातील बहुतांश देशांमध्ये आर्थिक सुधारणांचे वारे वाहत असले तरी दारिद्रयरेषेखाली जगणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये दोन वेळचे अन्नही धड न मिळणार्‍यांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत संपन्न देशांनी आपल्या संपत्तीचा छोटा हिस्सा गरिब देशातील जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यावर खर्च करायला हवा. या धारणेतून आता काही ठोस प्रयत्न केले जात आहेत. […]

न्यायव्यवस्थेला नवा हादरा

गेल्या काही दिवसांपासून न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराची चर्चा मोठ्या प्रमाणात गाजते आहे. कधी न्यायमूर्तींनी आपली संपत्ती घोषित करण्यावरून तर कधी एखाद्या न्यायमूर्तींकडे बेहिशेबी संपत्ती असल्याचे आरोप होतात. या बातम्यांमुळे जनमत बिघडत असतानाच देशाचे माजी कायदेमंत्री अनेक न्यायाधिश भ्रष्ट असल्याची माहिती देऊन प्रतिज्ञापत्र दाखल करतात, तेव्हा एकूणच व्यवस्थेला हादरा बसल्याशिवाय राहत नाही.
[…]

बिहारमध्ये राजकारण्यांची सत्त्वपरीक्षा

बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून रणमैदान गाजायला लागले आहे. लालू यादव-रामविलास पासवान यांची आघाडी, नितीशकुमार-भाजपची युती आणि काँग्रेस या तीन मुख्य स्पर्धकांमुळे बिहारचे निवडणूक समर गाजणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार रूप पालटत आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि दीर्घकालीन परिणाम करणारी ठरणार आहे.
[…]

ड्रॅगनचे विषारी फुत्कार

दक्षिण आशियामध्ये चीनला प्रभाव वाढवायचा आहे. त्यात त्यांना भारताचा अडथळा जाणवत आहे. दुसरीकडे जागतिक महासत्ता बनण्यासाठी त्यांची अमेरिकेशी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही आघाड्यांवर लढताना त्यांनी पाकिस्तानला हाताशी धरून भारताच्या सीमांवर अशांतता निर्माण करण्याचे धोरण ठेवले आहे. यात भारताचे बरेच नुकसान होत असून अमेरिका आणि चीन यांच्या वर्चस्वाच्या युद्धात भारत होरपळून निघत आहे.
[…]

गुन्हेगार, दारूडे

काही वृत्तपत्रात ज्या बातम्या झळकल्या आहेत त्या धक्कादायक आहेत. तसेही आजकाल वृत्तवाहिन्यांची अमाप पीक आल्यापासून धक्कादायक बातम्यांमध्ये जाण राहीली नाही.
[…]

“जेम्स लेन” वर कायदेशीर कारवाई अन् त्याच्या वादग्रस्त पुस्तकावर अधिकृत बंदीची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची अपकीर्ती करणार्‍या जेम्स लेनच्या ‘शिवाजी : द हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकावरील बंदी महाराष्ट्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. […]

शांततेचा लंबक इकडून तिकड

थोडक्यात- मानवाच्या प्रत्येक जखमेवर, दु:खावर काळच मात करू शकतो. त्यावर तोच उपाय आहे. काळाच्या ओघात हा आघातही दूर होईल. आता मी जे या खेपेला सांगितले, त्याचे तूही रोज मनन करशील. हे दोस्त, उदास… निराश नको होऊस! […]

“स्वाईन फ्ल्यू” संदर्भात “कोअर ग्रुप”ची स्थापना

राज्यातील इन्फ्ल्युएंझा ए (एच१एन१) या संसर्गजन्य आजाराची शासनाने गंभीर दखल घेतली असून अंमलबजावणी यंत्रणेत सुसूत्रता, समन्वय आणि नियंत्रण ठेवून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय कोअर ग्रुप’ची स्थापना करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी सांगितले. […]

1 9 10 11