जीवनाच्या रगाड्यातून
डॉ. भगवान नागापूरकरांचे जीवनातील विविध अनुभव सांगणारे हे सदर.
तरुणवयातील म. गांधीजींचा पुतळा
नुकताच
दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाचं वरदान लाभलेली भूमी असे
वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि
नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली,
क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी
श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपांनी
स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन
येत होतं. […]
मानसिक तणाव (क्रमशः ८ वर पुढे चालू)
सर्वच अडचणी व प्रश्न एका दमांत सोडविण्याचा प्रयत्न करु नका.
एका वेळी एकच प्रश्न वा अडचणीचे समाधान करा. असे म्हणतात की मानवी जीवन व त्याची दैनंदिनी ही एखाद्या तंबूप्रमाणे (Like a Tent ) असते. मध्यभागी एक उभा खांब आणि सर्व डोलारा निरनिराळ्या दोर्यांनी बांधलेला. दोर्यांची ढील वा आवळले जाणे सतत चालते.
[…]
बालकाच्या बुद्धीचा विकास कसा व केव्हां !
रस्त्याने एक फलक बघीतला. चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले होते. निरनिराळे वयोगट व त्यानी रेखाटलेली चित्रे यांची यादी …..
[…]
सौंदर्यातील एक दर्शन
आकर्षण आणि उपभोग ह्या भिन्न गोष्टी आहेत. जेंव्हा भिन्न, तेंव्हा त्याच्याकडे बघण्याचा द्दष्टीकोन देखील वेगळाच असू शकतो. उपभोगाची साधने, फक्त दोनच आहेत. एक शरीर व दुसरे मन. दोन्हीवर ताबा असतो तो विचारांचा, विवेकाचा. शरीराचा विकलांगपणा बघतांच मन त्याची साथ सोडून देते. बुद्धीमधला विवेक वरचढ बनतो. हाच विवेक मनाच्या चंचल स्वभावाला मुरड घालून, शरीराला जगवण्यासाठी साथ देण्यास सरसावतो. तुमच्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध तो शरीराला तन्दुरुस्त, आरोग्यवर्धक ठेवण्याचा प्रयत्न करतो. विवेकासमोर असतात फक्त दोन मार्ग. त्या निसर्गाचा शोध घेणे. अर्थात ईश्वर सान्निध्य व शरीराला त्याच्याशी एकरुप करण्याचा प्रयत्न करणे.
[…]
त्या दुर्दैवी जीवांना दया- मरण द्या
मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत. ‘ मनोरुग्ण ‘ हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो.
[…]
मला भाराऊन टाकल याने
बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा.
[…]
माना न माना !
हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या.
[…]
शुर्पणखाची एक सुडकथा
सौंदर्याचा अभिमान, प्रचंड अहंकार, हट्टीपणा, आणि आवडलेली कोणतीही गोष्ट हस्तगत करण्याची जीद्द हे तीच्या स्वभावांत होते. एक गमतीची गोष्ट म्हणजे तीची नखे पसरट सुपाप्रमाणे होती ( winnow- like nails ). ती तिक्ष्ण होती. म्हणून तीचे टोपण नांव शुर्पणखा […]