नवीन लेखन...

सुलेखनकार अच्युत पालव

सुलेखनकार अच्युत पालव यांचा जन्म २७ जानेवारी १९६० रोजी झाला.

आपल्या देखण्या अक्षरांच्या माध्यमातून सुलेखनाच्या क्षेत्रात पालव गेली ३५ हून वर्षे कार्यरत आहेत. अच्युत पालव यांचे शिक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून झाले. रघुनाथ कृष्णकांत ऊर्फ र. कृ. जोशी यांच्याकडे अच्युत पालव यांनी सुलेखनाचे धडे घेतले. १९८३ साली अच्युत पालव यांनी उल्का शिष्यवृत्तीसाठी मोडी लिपीचा पंधराव्या ते सतराव्या शतकांतील इतिहास, तसेच मोडी लिपीची विविध वळणे व अक्षररुपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करुन प्रबंध लिहिला. मोडी व आजची देवनागरी यांच्या दृश्य समन्वयातून ‘धृतनागरी’ तयार केली. तिला ‘मुक्त लिपी’ असे नाव दिले. या लिपीचा त्यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून ह्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करुन दिली. शैक्षणिक व संशोधन दृष्ट्या त्यांचे हे काम मोलाचे आहे. त्यांच्या सुलेखनात मोडी लिपीतून आलेला देवनागरी गोडवा हे त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे.

महाराष्ट्र शासनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेल्या आपला महाराष्ट्र व मार्ग प्रकाशनाच्या महाराष्ट्र या पुस्तकांत मुक्त लिपीच्या सुलेखनाचे नमुने आढळतात. ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम ह्या संतांच्या काव्यरचनांना सुलेखनाच्या माध्यमातून त्यांनी देखणे रुप दिले. तसेच ओम-अल्ला सारख्या सुलेखन-प्रदशर्नांतून सामाजिक बांधीलकी प्रकट केली.

जर्मनीतील ‘क्लिंगस्पोर’ या प्रख्यात सुलेखन संग्रहालयात आपली अक्षरचित्रे मांडणारे ते एकमेव भारतीय सुलेखनकार होत.

अच्युत पालव यांच्या कलाकारकिर्दीला पंचवीस वर्षे झाली तेव्हा त्यांनी भारतभर ‘कॅलिग्राफी रोडवेज’ हा उपक्रम राबवला. तो यशस्वी झाला. त्याचे वेगवेगळ्या राज्यांतील कलाकारांशी वैचारिक आदानप्रदान झाले. त्यांच्या कलेची व्याप्ती वाढली.

आज ते देश-विदेशात सुलेखनाच्या कार्यशाळा घेतात. दिल्ली विद्यापीठाने ब्रिटिश काउन्सिलमध्ये त्यांचे प्रदर्शन भरवलं होते. पॅरिसमधील एका भव्य व्यावसायिक संकुलाची सजावटीत जगभरातील सात सुलेखनकाराच्या बरोबर अच्युत पालव यांनी संस्कृत सुभाषितांच्या माध्यमातून देवनागरी लिपीला पॅरिसमध्ये पोहोचवली आहे.

अच्युत पालव यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..