नवीन लेखन...

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन

Bollywood Actress Ravina Tandon

आज २६ ऑक्टोबर..  आज बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनचा वाढदिवस.

रवीनाचा  जन्म २६ ऑक्टोबर १९७६  रोजी झाला.   १९९२ साली तिने पत्थर के फूल ह्या हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या.

परंपरा, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां इत्यादी तिचे काही चित्रपट आहेत. १९९० च्या दशकामध्ये रविना बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असली तरीही तिच्या अभिनयासाठी ती विशेष ओळखली जात नसे. परंतु २००१ सालच्या दमन ह्या चित्रपटासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तसेच मधुर भांडारकरच्या २००३ मधील सत्ता ह्या चित्रपटामधील अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..