नवीन लेखन...

मैत्री

मैत्री असते आंबट गोड हृदयाला हृदयाची जोड मैत्री असते मायेची पाखर तुझ्या सुखाला माझ्या आनंदाची झालर मैत्री असते राधाकृष्णाची बासरीच्या सुरात विरघळण्याची मैत्री असते जिवाभावाची मनातले गुपित हळूच ओळखण्याची मैत्री असते हळवे पणाची माझे अश्रु तिने पुसण्याची मैत्री म्हणजे सतारीची तार माझ्या वेदनेचे तुझ्या काळजात झंकार मैत्री म्हणजे आंधळ्याचा डोळा रणरणत्या उन्हात बर्फाचा गोळा -स्वप्ना साठे […]

आठवणींच्या विश्वात

वाळूत ओढत रेघा, मी बसले होते आठवणींच्या विश्वात मी रमले होते. कुठून तरी चाहुल मला लागली दुसरे नव्हते कुणी माझेच मन होते कधी मी मनाला कधी मन मला अनेक आठवणींचे झरे वहात होते आठवणीच्या झऱ्यांनी शब्द मूक झाले बोलण्याचे काम मग अश्रूंनीच केले. – कु. निलांबरी शां. पत्की व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

स्त्री

स्त्री आहे अंबा,दुर्गा आणि काली, अष्टभुजा धारण करणारी रणरागिणी. सांभाळ करून सर्व नात्यांचा प्रेमाने, गाजवते अधिराज्य जगात शक्तीने आणि युक्तीने. बाबांच्या ह्या इवल्याश्या परीने, फुलविला तिचा संसार स्वकर्तृत्वाने. मिळाली देणगी मातृत्वाची हिच्या उदरी, संयमाने करते ती पालनपोषण दिवस-रात्री. शिकवतेस जगाला प्रेम, आपुलकी आणि माया, नाही पडू देत संसारावर कधी दुःखाची छाया . सांभाळताना तुझ्या संसाराचा गाडा, […]

पर्यटन आणि आरोग्य

पर्यटन प्रवास प्रवास कशासाठी असे विचारले तर पहिले उत्तर कायाकल्प – Rejuvination असेच असेल. रोजच्या कष्टमय कंटाळवाण्या नित्यक्रमातील हा रम्य काळ. […]

करावे पर्यटन

डॉ. रिमा वीस दिवसानंतर आज पुन्हा क्लिनिकला आली तेव्हा किती वेगळी दिसत होती. एक वेगळाच तजेला तिच्यात दिसत होता. एक वेगळाच उत्साह दिसत होता. त्याच्याआधी पाच-सहा महिने खूपच व्यग्र गेले होते. सतत पेशंट्स बघणे, कधी या क्लिनिक तर कधी त्या क्लिनिकनला जाऊन. […]

हॉटेल आणि आरक्षण

जेव्हा आपण फिरण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चांगल्या ठिकाणी राहणं. आज इंटरनेटच्या माध्यमामुळे Hotels Reservation करणं अत्यंत सोपं झालंय. पण आजही अनेक पर्यटक स्वत: Hotel Rooms त्याचं location पाहिल्याशिवाय बुकिंग्ज करत नाही. जे पर्यटक Tour Operators बरोबर प्रवास करतात त्यांची सगळी सोय त्या कंपनीतर्फे केली जाते. […]

गलेलठ्ठ नोटांच्या गठ्ठ्यांनो

गलेलठ्ठ नोटांच्या गठ्ठ्यांनो आणि खणखणीत आवाज उमटवणाऱ्या तालेवार, चमकदार नाण्यांनो… डॉलर, पौंड, युरो, दिनार, रुपये ही तुझी दिमाखदार, लोभस, राजस रूपे विविध रंगांनी, ढंगांनी नटलेली, सजलेली. डिजिटल क्रांतीत गोठलेली, मात्र 24X7 टक्के जागी, सदैव तत्पर असलेली आणि… माणसाचं अवघं आयुष्य प्राणपणाला लावणाऱ्या, त्याला थकवणाऱ्या, आणि सतत पळायला लावणाऱ्या क्रिप्टोकरन्सी नामक आभासी चलनांनो… तुमचे चाल-चलन आता आम्हाला […]

नकाशे

आता सर्वसामान्य माणसाचा आर्थिकस्तर उंचावल्याने आणि नोकरदारांची अनेक कार्यालये कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन प्रवास पर्यटनासाठी आर्थिक सवलती देत असल्याने लोकांचा विविध प्रकारच्या पर्यटनाकडे ओढा वाढलाय. गतिमान, यांत्रिक जीवनात आपली बॅटरी चार्ज होण्यासाठी लोकांनाही एक सुखद बदल म्हणून प्रवासाला जाण्याची आवश्यकता वाटते. त्यामुळे चार सहा दिवस वेगळ्या वातावरणातील पर्यटनाला जाण्यासाठी त्यांचा मनोदय असतो. […]

स्टेट बँक माझी सखी

स्टेट बँकेत नोकरीला लागण्याआधी मी, सात वर्ष अनेक प्राईव्हेट नोकऱ्या केल्या. पण या काळातच आपण स्टेट बँकेतच नोकरीला लागायचे हे माझे ठरलेले होते. याला दोन कारणे होती एकतर माझा एस.के. नावाचा एक चुलत भाऊ स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेत नोकरीला होता, मी अनेकवेळा त्याला भेटायला स्टेट बँकेत जायचो आणि ही स्टेट बँक मला तेंव्हापासूनच आवडली होती. […]

1 13 14 15 16 17 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..