नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर

कविता, गाणी, शेर-शायरी, पटकथेचे ‘शब्दप्रभू’ आणि आपल्या लेखणीची रसिकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. जावेद अख्तर यांचं नाव लहानपणी ‘जादू’ असं होतं. शायरीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे आणि वडिलांनी लिहिलेल्या उर्दू शेरमधील एका वाक्यातून त्यांचं नाव निवडलं गेलं होतं. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द त्यांनी […]

‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर

स्वरराज छोटा गंधर्व व पं. कुमार गंधर्व यांचे समकालीन असलेले परंतु फारसे परिचित नसलेले असे एक गंधर्व म्हणजे ‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर. ते गोमांतकात जन्मले. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे दीनानाथ, बालगंधर्व व कृष्णराव यांना गुरुस्थानी […]

बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गार्बो’ – अभिनेत्री सुचित्रा सेन

किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत. […]

जेष्ठ निर्माता-दिग्दर्शक कमल अमरोही

कमल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ रोजी झाला. कमल अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी भारतीय चित्रपटसुर्ष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. कमाल अमरोही व मीनाकुमारीचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक दंतकथा. आणि त्यातील सारी […]

कलामहर्षी बाबूराव पेंटर

दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला.  पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! त्यांचा जन्म २ जून १८९० रोजी झाला. ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत! बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते […]

जेष्ठ मराठी नाट्य अभिनेते आणि गायक चंदू तथा चंद्रकांत हरी डेगवेकर

डेगवेकर यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. डेगवेकर यांचा जन्मही इथलाच. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९३४ रोजी झाला. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्रीवर्धन येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. गिरगाव येथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी कामे केली. पुढे ‘सीटीओ’ (पोस्ट अॅाण्ड टेलिग्राफ)मध्ये त्यांना ‘फोनोग्राम […]

चित्रपट-दिग्दर्शक व नाट्यदिग्दर्शक केदार शिंदे

केदार शिंदे हा शाहीर साबळे यांचा नातू. त्या मुळे त्याला लहानपणापासून पासूनच कलेची आवड होती. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९७३ रोजी झाला. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमापासून केली. त्यानंतर त्याने भारत जाधव आणि अंकुश चौधरीबरोबर एक एकांकिका केली होती. केदार शिंदे याने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात ‘बॉम्ब-ए-मेरी-जान’ या नाटकाने पहिलं पाऊल टाकलं. ह्या नाटकाला फारसं यश मिळाले […]

लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन

तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांचा जन्म १७ जानेवारी १९१७ रोजी झाला. मरुदुर गोपालन रामचंद्रन, ऊर्फ एम.जी. रामचंद्रन किंवा एमजीआर, यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. हे सलग तीन मुदतींसाठी मुख्यमंत्री होते. तरुणपणी एम.जी. रामचंद्रन आणि […]

कबीर बेदी

कबीर बेदी,फिल्म इंडस्ट्रीतील हे असं नाव आहे,जो आपलं आयुष्य नेहमी आपल्या अंदाजात जगत आला आहे. त्यांचा जन्म १६ जानेवारी, १९४६ रोजी लाहोर(पाकिस्तान)मध्ये झाला.या व्यक्तीने कधीही सामाजिक आदर्शांना महत्त्व दिले नाही किंवा व्यवहारिक नैतिकेवरही विश्वास ठेवला नाही.मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात करणारे कबीर बेदी आपल्या काळातील सुंदर स्त्रियांना आकर्षित करण्यात नेहमीच यशस्वी राहिले.करिअरमध्ये ते आपल्या समवयीन अभिनेत्यांपेक्षा […]

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री भानुप्रिया

भानुप्रिया हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील असे एक नाव आहे, ज्याला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९६७ रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंदरी(रंगमपेटा गाव)येथे झाला. भानुप्रियाने तामिळ,तेलगु,कन्नड आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे. भानुप्रियाचे खरे नाव मंगा भामा आहे. तिच्या घरी अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती. शाळेत असताना दिग्दर्शक भाग्यराजा गुरू एके दिवशी शाळेत आले. त्यांना त्यांचा […]

1 258 259 260 261 262 423
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..