Articles by निलेश बामणे
श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा होऊ नये !
त्याची पत्रिका मी माझ्या पद्धतीने पाहिल्यावर माझ्या लक्षात आले त्याचा जन्म सत्तावीस नक्षत्रातील सर्वात विषारी समजल्या जाणाऱ्या आश्लेषा नक्षत्रात झालेला होता त्यामुळेच त्याच्यावर हे आकस्मित संकट ओढावले होते त्याला निमित्त मात्र त्याच्या वडिलांचे बिडी पिणे आणि त्यामुळे झालेला कर्करोग होता भविष्य कोणालाही टाळता अथवा बदलता येत नाही ज्योतिष शास्त्रामुळे फक्त त्याचा अंदाज घेता येऊ शकतो इतकंच … […]
माझ्या कल्पनेतील विमान…
माझ्या स्वप्नातील विमान जमिनीवर स्थिरावताच माझ्यातील माणुसकीही क्षणात मेली होती… © कवी – निलेश बामणे […]
मोठं होणं म्हणजे नक्की काय असतं ?
मोठं होण म्हणजे नक्की काय असतं ? माझा बाप म्हणतो… लग्न कर ! पोर काढ ! मग कळेल तुला मोठं होणं म्हणजे नक्की काय असतं… मी मनात म्हणतो बापाला… तुम्ही आम्हालाच काढलं नसत तर झालाच नसता ताप तुम्हाला मला आणि आता जगाला… लोक पोरं काढण्यासाठी लग्न करतात किती हा मूर्खपणा ? ती तर लग्न न करताही […]
तू…
तू कोणाची का होईना तुझ्या हृदयातील एक जागा मोकळी राहायलाच हवी… मी जिवंत असेपर्यत तुला माझी आठवण यायलाच हवी … मला गमावल्याची किंमत तुला काळायलाच हवी … माझ्या समोर येता तुझी नजर झुकायलाच हवी… तुझ्या आयुष्यात एकदा तू माझी मदत मागायलाच हवी… माझे सर्वस्व पणाला लावून मी ती तुला करायलाच हवी… कवी – निलेश बामणे, ( […]
वेदना…
मी काल दिलेल्या वेदना आज भोगतोय… मला आज दिलेल्या वेदना तू उद्या भोगशील… वेदनांचा हा जमाखर्च आता असाच सुरु राहणार… चेहऱ्यावर हसू असणार आणि हृदय जळत राहणार… शरीर झिजत जाणार मन तरुणच राहणार… शरीर नष्ट होणार पण वेदना तशीच राहणार… वेदनेचे गणित पुन्हा कोणी दुसरे मांडणार… या जगात शेवटी वेदना वेदनाच राहणार… – निलेश बामणे ( […]
प्रसिद्धी
वर्तमानकाळात उभा राहून भूतकाळ आणि भविष्यकाळ मी दोन्ही पाहतोय… भूतकाळ बरा होता , भविष्यात मी स्वतः च स्वतःला शोधतोय… मोहाच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलोय… त्या ढिगाऱ्यावर ती बसलेय माझी प्रसिद्धी ! माझ्या प्रेयसीचा हात हातात घेऊन… मी प्रेमाची शिक्षा भोगतोय आतल्या आत गुदमरतोय… निलेश बामणे ( बी डी एन )
धागा
तू काय ? ती काय ? मी काय ? सारेच एका माळेचे मणी वेगवेगळ्या रंगाचे एकाच धाग्यात गुंफलेले कोणी आधी गुंफलेले कोणी नंतर धागा तुटता सारेच पसरलेले अपघाने दोन मणी जवळ येतात हलकासा वारा येताच विलग होण्यासाठी … ©निलेश बामणे
स्वप्ने
तुझी स्वप्ने तू जग माझी स्वप्ने मी जगतो भेटूच आपण एकदा स्वप्नांचा हिशेब मांडायला सारखी स्वप्ने वजा करू उरलेली मिळून पूर्ण करू ©निलेश बामणे
