सुपर कॉम्प्युटर (महासंगणक)
१९२९ मध्ये द न्यूयॉर्क वर्ल्डने सुपर कॉम्प्युटर हा शब्द पहिल्यांदा आयबीएमच्या टॅब्युलेटर्ससाठी वापरला होता. त्यानंतर १९६०च्या सुमारास कंट्रोल डेटा कॉर्पोरेशनमध्ये काम करताना सेमूर क्रे यांनी पहिला महासंगणक तयार केला. […]
१९२९ मध्ये द न्यूयॉर्क वर्ल्डने सुपर कॉम्प्युटर हा शब्द पहिल्यांदा आयबीएमच्या टॅब्युलेटर्ससाठी वापरला होता. त्यानंतर १९६०च्या सुमारास कंट्रोल डेटा कॉर्पोरेशनमध्ये काम करताना सेमूर क्रे यांनी पहिला महासंगणक तयार केला. […]
डॉ. सी. एन. आर. राव यांना त्यांच्या आयुष्यभराच्या विज्ञान संशोधन व विज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. १९३४ साली जन्मलेले प्रा. राव यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएस्सी केली. प्रा. राव यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून एमएस्सी केली, तर अमेरिकेच्या पर्यु विद्यापीठातून पीएचडी केली. […]
संगणक वापरणाऱ्यांच्या तोंडी, ‘व्हायरस’ हा शब्द नेहमीच ऐकू येतो. आपल्या संगणकाला विविध प्रकारे आजारी पाडणारे हे व्हायरस म्हणजे काय, संगणकावर त्यांचा परिणाम काय होतो, त्यांची कार्यपद्धती कशी असते, त्यांचे निर्मूलन कसे केले जाते, इत्यादी बाबींचा ऊहापोह करणारा हा लेख… […]
१९३७ साली राजस्थानातल्या जोधपूर येथे जन्मलेले मनमोहन शर्मा जोधपूरच्या जसवंत महाविद्यालयातून बीएस्सी झाले. नंतर मुंबई विद्यापीठातून बीई व एमटेक या रसायन अभियांत्रिकीतील पदव्या घेतल्या. नंतर केंब्रिज येथून त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर ते मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन करू लागले व पुढे या संस्थेत संचालक झाले. […]
पॉल रत्नसामी यांचा जन्म चेन्नईला १९४२ साली झाला. चेन्नईच्या विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. केली. त्यानंतर पुढील दोन वर्षे त्यांनी न्यूयॉर्क येथील क्लार्कसन तंत्रशास्त्र महाविद्यालयात संशोधन केले व पुढे बेल्जियम येथील लिव्हान विद्यापीठात प्रा. फ्रिप्लाट यांच्याबरोबर संशोधन केले. औद्योगिक उत्पादन करताना वापरावी लागणारी उत्प्रेरके (Catalyst) हा या दोन्ही ठिकाणच्या संशोधनाचा विषय होता. […]
पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पहिले भारतीय संचालक होते डॉ. के. वेंकटरामन! त्यांचा जन्म चेन्नईचा! तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून १९२३ साली ते रसायनशास्त्रात एम.ए. झाले. नंतर मॅन्चेस्टर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी आणि डीएससी केले. १९२७ साली ते भारतात परत आले आणि एक वर्ष बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये फेलो म्हणून कार्यरत होते. १९२८ ते १९३४ या काळात ते लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत असत. […]
भारतातील देवस्थानांभोवती असणाऱ्या देवराया ही जैवविविधतेची केंद्रे आहेत. अनेक सजीवांचे वसतिस्थान असणाऱ्या अशा जागा जगात इतरत्रही काही ठिकाणी आढळतात. इथिओपियातल्या देवराया हे अशा देवरायांचेच एक उदाहरण. इथिओपियात जी थोडीफार वनसंपत्ती टिकून आहे, ती या देवरायांमुळेच. या देवराया टिकून राहाव्यात म्हणून इथिओपियात प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांची ही माहिती… […]
डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला ते एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांन त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासार्ट भारतात बोलावून घेतले १९६७ साली ते थुम्ब येथे झाले […]
प्रा. हरी जीवन अर्णीकर (१९१२- २०००) यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. बनारस हिंदू विद्यापीठातून एम.एस्सी. करून त्यांनी तेथेच ‘कोरोना इफेक्ट ॲन गॅसेस अंडर डिस्चार्ज’ या विषयावर पीएच.डी. केली. १९५५ मध्ये पॅरिस येथील प्रा. फ्रेडरिक जुलिएट क्यूरी आणि प्रा. इरेन क्यूरी या नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘सेपरेशन ऑफ आयसोटोप बाय इलेक्ट्रोमायग्रेशन इन फ्युज्ड सॉल्टस’ हा प्रबंध […]
पृथ्वीभोवतालच्या अंतराळात बराच कचरा जमा झाला आहे. आपणच निर्माण केलेला हा कचरा, आज आपल्याच उपग्रहांना घातक ठरतो आहे. आपल्या भोवतालच्या अंतराळाचा, आपल्या सुखसोयींसाठी पूर्ण क्षमतेने उपयोग करायचा असेल, तर या कचऱ्याचा वेळेवर निचरा होणेही गरजेचे आहे. या ‘अंतराळ कचऱ्याच्या संदर्भातील विविध बाबींवर प्रकाश टाकणारा हा लेख… […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions