औषधांची साठवण कशी करायची
औषधांची परिणामकारकता व सर्व गुणधर्म जपण्यासाठी त्यांची घरात योग्य ठिकाणी साठवण करणे आवश्यक असते. सूर्यप्रकाश, उष्णता, दमटपणा, पाणी यामुळे औषधांचे विघटन होऊन मुदतीआधीच ती निरुपयोगी होऊ शकतात. म्हणूनच खिडकीत, फ्रीजवर, टी. व्ही. वा ओव्हनवर, गॅसजवळ, किचन टेबलवर (चटणी, लोणच्यांच्या सोबत), बाथरूममध्ये, बेसीनजवळ अशा ठिकाणी औषधे ठेवू नयेत. कोरड्या व थंड ठिकाणी औषधे ठेवणे उत्तम. शक्यतो घरातील […]
