नवीन लेखन...
Avatar
About जयेश शत्रुघ्न मेस्त्री
हिंदूत्त्व या विषयावर परखडपणे लिहिणारे श्री जयेश मेस्त्री हे व्यवसायाने विमा (एल. आय. सी )आणि गुंतवणूक एजंट आहेत. ते हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत.

राजसाहेब, माफ़ करा, पण…..

माननीय राजसाहेब ठाकरेजी, तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखतो. तुम्हाला कोण नाही ओळखत? मी आपल्याच महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य नागरिक आहे. म्हणजे तुमचे फ़ोटो मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवणारा, कामाला दांडी मारुन तुमचे भाषण ऎकायला येणारा, टी.व्ही मध्ये जर तुमची मुलाखात असेल तर सगळी कामं बाजूला ठेऊन ते पाहणारा, तुमच्या चळवळींना (अहिंसक मार्गाने) पाठींबा देणारा आणि मतदानाच्या वेळी तुम्हाला मत देणारा, मी एक सर्वसामान्य मराठी हिंदु नागरिक आहे. […]

टिपू सुलतान नव्हे टिपू सैतान

स्वामी विवेकानंद म्हणत “स्वातंत्र्य काय आपण एका दिवसात आणून दाखवू शकतो. पण त्यासाठी आपण तयार झालो आहोत काय? समाज जोपर्यंत त्यासाठी पूर्णतः तयार होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य अर्थहीन आहे.” स्वामी विवेकानंदांचा हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा. आपण खरंच स्वातंत्र्याच्या लायकीचे आहोत काय? मानसिक गुलामच आहोत आपण. परकियांनी लिहिलेल्या इतिहासाबद्दल आम्हाला (हिंदूंना) पराकोटीचा आदर वाटतो. म्हणे सिकंदर हा जगज्जेता होता. अहो, ज्या माणसाला भारताचा साधा एक प्रांत टिकवता आला नाही, तो माणूस जगज्जेता कसा असू शकेल? त्याला स्वतासाठी, देशासाठी काहीच करता आले नाही म्हणून त्याच्याच गुरुने (ऍरिस्टॉटलने) त्याला विष पाजून मारून टाकले. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..