नवीन लेखन...

वातावरणाच्या शुद्धीसाठी भेषज यज्ञ, अग्निहोत्र वगैरे…….

पूर्वी आपल्याकडे विश्वाच्या सुख-शांती आणि कल्याणासाठी विविध यज्ञ केले जात. आज या यज्ञांविषयी उपेक्षेने बोलले जात असले तरी नासासारख्या जगन्मान्य संशोधन संस्थेने यज्ञांबाबत संशोधन केले आहे. त्या संशोधनानुसार यज्ञामुळे त्या परिसरातील हवेतील विषाणू व जिवाणू नष्ट होऊन वातावरणशुद्धी होते. यज्ञामध्ये धूप, वनस्पती, औषधी इ.ची किती प्रमाणात आहुती दिली. यावर यज्ञाचे कार्यक्षेत्र किती मोठे असेल ते ठरते.
[…]

अध्यात्म म्हणजे काय?

परवा शेजारचे काका कौतुकाने सांगत होते, ‘आमचा सुरेश या वयात अध्यात्माकडे वळलाय. दर मंगळवारी पाच पाच तास रांगेत उभे राहून सिध्दिविनायकाचे दर्शन घेतो.’ मी जरा विचारात पडलो. सुरेश हा कॉलेजात जाणारा मुलगा. या वयात तो अध्यात्माकडे वळलाय याचे त्याच्या वडिलांना कौतुक. दुसरा भाग म्हणजे पाच तास रांगेत उभे राहिला म्हणजे अध्यात्म केले हा एक समज. रांगेत उभे राहुन दर्शन घेणे हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग. पण अध्यात्म म्हणजे काय?
[…]

साथ,सोबत संगत…

ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा

पोकळी असते.
[…]

मराठी भाषा दिन

मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला सर्वत्र जागतिक मराठी दिन साजरा केला जातो.
[…]

सारोळ्याचे वनपर्यटन

औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.
[…]

लोकसाहित्यातील अभ्यासकांना नवा आहेर

बहिणाबाई चौधरी यांच्या गीतांच्या निमित्ताने अहिराणी या खानदेशी बोलीभाषेशी परिचित झालो; परंतु ती खरी अहिराणी नसून खानदेशी वऱहाडी भाषा असल्याचे प्रा. डॉ. उषाताई सावंत यांच्या उपरोक्त शीर्षकाच्या शोधनिबंधपर पुस्तकातून आपणास ज्ञात होते. एखादी खरी व नवीन माहिती देण्याचे ध्येय या एकाच उदाहरणावरून कसे या पुस्तकास साध्य झाले आहे, ते लक्षात येते.
[…]

गिरिभ्रमण – एक सशक्त खेळ

श्री. पाळंदे तीस वर्षे गिरिभ्रमण करताहेत. उदंड अनुभवाचा इतरेजनांना फायदा व्हावा, या सद्हेतूने त्यांनी `डोंगरमत्री’चं लेखन केलं. यातील तीसही लेख अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक आहेत. गिरिकंदरामध्ये भटकण्याचा अनुभव घरबसल्या रसिकाला घेता येईल, या दृष्टीने पुस्तकाची जडणघडण डोळ्यात भरते. […]

हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे ?

हृदयविकारास कारणीभूत होणार्‍या रक्तवाहिन्या चरबीच्या अंतर्लेपाने जाड होण्याची प्रक्रिया कोणत्याही एकाच कारणाने होत नसते. संशोधनांती अशा अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत की ज्यामुळे हा विकार वाढीस लागतो त्यांना रिस्क फॅक्टर्स म्हणतात. त्यापैकी बरीच कारणे टाळता येण्यासारखी असतात. ती दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. […]

1 233 234 235 236 237 238
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..