नवीन लेखन...

वेश्या…

अनेक पुरुषांच्या वासनेला आपल्या शरिरात
विषासारखे सामावून घेणारी स्त्री म्हणजे वेश्या…
आई ,बहीण ,बायको, मुलगी ,प्रेयसी आणि मैत्रीण बनून
स्त्री सतत सोबत असतानाही पुरुषांना लागते वेश्या…
स्त्री आहे फक्त एक उपभोगाची वस्तू आणि दासी
हे मानणाऱ्या पुरुषांना हवी असते सोबतीला वेश्या…
रोगावर औषध देणाऱ्या वैद्याला जर देव मानतात
तर कामुकतेवर औषध ठरणारी पापी कशी वेश्या…
स्त्रीला निसर्गतः दिलेल्या स्वातंत्र्यावर घाव घालून
पुरुषानेच आपल्या स्वैराचारासाठी निर्माण केली वेश्या…
वेश्येकडे जाणारा पुरुष आजही मिरवतो पुरुषपणा
पण गमावून बसते आपले स्त्रीत्व क्षणाक्षणाला वेश्या…
स्रीचा उपभोग घेणारा आणि तिला कामसुख देणारा
पुरुषच ठरतो पुरुष म्हणून जन्माला येते वेश्या…
धर्म झाकतो काही स्त्रियांची पापे उगड्या डोळ्यांनी
नाहीतर गल्लो गल्ली सापडल्या असत्या अनेक वेश्या…
शरीराच्या भुकेसाठी नाही तर पोटाच्या भुकेसाठी
गरीब बिचाऱ्या स्त्रिया होत असतात वेश्या…
पुरुषातील माणूस जागा झाला कि स्त्री देवी होते
आणि पुरुष जागा झाला की मग देवीची वेश्या…
 
© कवी – निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..