बंधन मुक्तीसाठीं असतां,
बंधनात ते पाडी
कर्मफळाचे एक अंग ते,
टिपे दुसरे बाकी ।।१।।
साध्य करण्या जीवन ध्येय,
देह लागतो साधन म्हणूनी,
सद्उपयोग करूनी घेतां,
साध्य होईल हे घ्या जाणूनी ।।२।।
हिशोब तुमचा चुकून जाता,
तोच देह बनतो मारक,
विनाश करीतो मागें लागतां,
मिळविण्यास ते ऐहिक सुख ।।३।।
बंधन पडते आत्म्याभोंवती,
शरिरांतल्या वासने पायी,
वासनेच्या आहारी जातां,
बंधनास ती बळकटी येई ।।४।।
तपसाधनेचे कष्ट करूनी,
देह करीतो आत्म्यास मुक्त,
देहाचे बंधन पडते,
जेव्हां बनतो वासनायुक्त ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com


Leave a Reply