नवीन लेखन...

प्रेम म्हणजे काय आहे ?

प्रेम म्हणजे काय आहे ?

ते कसं व्यक्त होतं ? एखाद्या युवकाने एका देखण्या मुलीवर भाळणं आणि त्या देखण्या मुलीनं त्या युवकावर भाळणं हे स्वाभाविक असतं, पण त्यास प्रेम म्हणण्याऐवजी आकर्षण म्हटलं पाहिजे.

आकर्षण आणि प्रेम या भिन्न बाबी असूनही काही क्षणापुरते ते दोघे एकजीव होतात व बऱ्याच जणांची इथे फसगत होते..

कधी-कधी ज्यांच्यावर तुमचं प्राणापलीकडे प्रेमं असतं त्याच्या हृदयालाही त्यामुळे ठेच पोहचते. अगदी आपल्या मनाविरुध्द पण डोळयात आलेले अश्रू आणि कंठातील हुंदक्याचे कढ आतल्या आत गिळून जीवनाचा आणि जगाचा एक भाग बनून राहावं लागतं. प्रत्येक क्षण, प्रत्येक वस्तू, प्रत्येक जागा, तिच्या आठवणी जागवत असतात, क्षणोक्षणी डोळे ओले करतात अन् आयुष्य उदास करुन जातात. ही व्यक्ती जर तुमची प्रेमिका असेल तर मग जीवनाचे गणितच कठीण होऊन बसते. आपल्याला तिची जी आठवणं आटलेल्या विह्निरीच्या तळाशी असलेल्या पाण्यासारखे किंवा वैराण नदीतील वाळूच्या आतील ओलाव्यासारखी आनंद देते.
प्रेम एकमेकांच्या आयुष्यात प्रेरणा ठरत असेल, त्या प्रेमाच्या शब्दाने जर आपली करिअरकडे
जाणारी उंच भरारी आणखी वेगाने जात असेल तर ते आदर्श प्रेम, तिनं आपल्याला व्यसनापासून दूर नेणं ते आदर्श प्रेम, एकमेकांच्या सहवासात एकांतात् प्रेम न’ करताही एक प्रेरक वरदान ठरेल. कॉलेजमधल्या तरुणांना ह्या भावना आवरण एक आव्हानचं आहे. आपली प्रेयसी नाही, म्हणजे कॉलेजमध्ये मजा नाही असं काही तरुणांना वाटत असेल पण शिक्षक, नातेवाईक सांगतात की, हे पाऊल दोघांच्या दृष्टीने घातक आहे तर याचा प्रत्ययही नंतर येतो. मान्य आहे की, आजकाल माणसातला जिव्हाळा संपला, कधी-कधी कुणालाही वाटते की नकळत वा जिव्हाळयाची एखादी व्यक्ती आपली असावी असं वाटतं. त्या व्यक्तीशी आपलं कोणतच नात नसावं. पण तो माणू आपलं असावं असं वाटते, परंतु भावनेच्या भरात बऱ्याचवेळा आपण एखादा निर्णय घेतों आणि त्यालाच विश्व समजतो नंतर आपल्या करिअरच्या वाटा आपणच बंद करतो.

– निलेश सुरेश कवळे (सुपुत्र)

Avatar
About निलेश सुरेश कवळे 6 Articles
निलेश कवळे हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील उदयोन्मुख मराठी लेखक, पत्रकार आणि सामाजिक विचारवंत आहेत. त्यांनी समाजकार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण (Master of Social Work) पूर्ण केले असून समाजातील विविध पैलूंची सखोल जाण त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने दिसून येते. ते लोकसंवाद चर्चापत्र या दैनिकामध्ये खामगाव शहर प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून सामाजिक प्रश्न, स्थानिक घडामोडी आणि जनतेच्या समस्यांवर लेखन करतात. पत्रकारितेसोबतच ते एक संवेदनशील लेखक व कवी म्हणूनही ओळखले जातात. ते प्रतिलिपी सारख्या डिजिटल व्यासपीठांवर नियमितपणे कथा, लेख आणि कविता प्रकाशित करतात. निलेश कवळे यांनी Amazon वर ई-बुक आणि पेपरबॅक स्वरूपात अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या लेखनाचा मुख्य केंद्रबिंदू स्व-विकास, नातेसंबंधातील गुंतागुंत, भावनिक संघर्ष आणि वास्तव जीवनातील अनुभव हे आहेत. त्यांचे आगामी मराठी पुस्तक “चार लोक काय म्हणतील” हे समाजातील दबाव आणि व्यक्तीच्या मानसिकतेवर आधारित असून वाचकांना स्वतःच्या विचारांप्रमाणे जगण्याची प्रेरणा देते. लेखनासोबतच ते सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतात आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या लेखनात साधेपणा, प्रामाणिकपणा आणि जीवनाशी असलेली घट्ट नाळ स्पष्टपणे जाणवते. आपल्या विचारांनी आणि लेखनातून वाचकांना प्रेरित करण्याचा त्यांचा प्रवास सतत सुरू आहे
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..