सुरण याला इंग्रजीत याम म्हणतात तर आयुर्वेद याला अर्शघ्न असे म्हणतात. अत्यंत गुणकारी व पौष्टिक आयुर्वेदात याचे वर्णन करतात. यात काय नाही जे जे पाहिजे ते सर्व यात आहे. मात्र सर्वात जास्त सुरणात होणारे गुण म्हणजे मूळव्याधापासून मुक्तता. सुरण कोणत्याही प्रकारे म्हणजे उकडून अथवा तुपात तळून अशा प्रकारे सुरणाचा वापर करता येतो. सुरण हा रताळीबरोबर उपवासालाही चालतो. तसेच सुरणात येणारी शक्ती ही प्रचंड असते. लहान मुलांना व सर्व ज्येष्ठ नागरिकास सुरण फारच उपयोगी पडतो. विशेष म्हणजे सुरणामध्ये कोलेस्ट्रेरॉल अजिबात नसतो. म्हणून सुरण व बटाटा आणि रताळे यांचा मिश्र उपयोग केल्यास खूपच फायदा होतो.
सुरणापासून खालील उपयोग आढळतात.
१. सुरणाने कांती मुलायम होते.
२. कोलेस्ट्रेरॉल, रक्तदाब वाढल्यास सुरणाने त्वरित बरा होतो.
३. कर्करोग झाल्यास वेदना कमी करण्यात फायदेशीर ठरते, असे म्हणतात.
४. पोट साफ न झाल्यास सुरणाचा वापर करावा.
५. किडनी अथवा मूत्रदोष नाश पावतो.
६. सुरणाने पचनशक्ती वाढते, अंगातील शक्तीही वाढते.
– मदन देशपांडे
Leave a Reply