नवीन लेखन...

ट्यूबलेस टायर

मोटरसायकल किंवा चारचाकी वाहन नको त्या वेळी पंक्चर झाले तर काय डोकेदुखी होते हे सर्वांना माहिती आहे. त्यासाठीच अलिकडे ट्यूबलेस टायर वापरले जातात. यात नावातच सांगितल्याप्रमाणे फक्त टायर असतो व ट्यूब मात्र नसते. पारंपरिक सायकलींपासून सर्वच वाहनात आपण टायर व आतमध्ये ट्यूब अशी रचना पाहतो. जेव्हा असे टायर असलेले वाहन पंक्चर होते, तेव्हा त्यातील ट्यूब बलूनसारखी फुटते व सगळी हवा काही वेळातच निघून जाते व गाडी ढकलण्यावाचून पर्याय राहत नाही.

ट्यूबलेस टायरमध्ये थेट टायरमध्येच हवा भरली जाते व असे टायर बनवताना हॅलो किंवा क्लोरो ब्युटिलचे लायनिंग त्याला हवाबंद करण्याचा गुणधर्म प्राप्त करून देतात. टायर आणि चाक यांच्यातील हवाबंद करण्याची | यंत्रणा व पटल यांच्यामुळे या टायरमध्ये हवा राहण्यास जागा निर्माण होते.

जेव्हा गाडीचा वेग जास्त असतो, तेव्हा टायरचे तपमान वाढते परिणामी टायरवरचा दाब वाढतो अशा अवस्थेत एखादी अणकुचीदार वस्तू टोचली तर साधारण टायर लगेच पंक्चर होतो कारण त्याच्यातील ट्यूबला छिद्र पडून हवा फुगा फुटतो तशी एकदम निघून जाते. ट्यूबलेस अर्थवेध टायरमध्ये हवा थेट भरलेली असते.

त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे ते कमी तापतात, त्यातच ते अॅलॉय व्हीलवर बसवलेले असतील तर आणखी फायदा होतो. जरी अशा टायरला काही टोचले तरी हवा एकदम जात नाही, जेवढे छिद्र असेल तेवढ्याच भागातून जाते. काही वेळा जी वस्तू टोचलेली असते तीच पक्की राहून हवा बाहेर पडण्याचे प्रमाण कमी असते.

त्यामुळे टायर एकदम खाली बसत नाही. टोचलेला खिळा काही दिवस राहिला तरी हे टायर पंक्चर होत नाहीत. हवा जाते पण हळूहळू जाते. ट्यूबलेस टायर वजनाने ५०० ग्रॅम कमी असतो. नेहमीच्या टायरमध्ये असलेली ट्यूब एवढी वजनदार नसली, तरी जेव्हा वाहन चालवले जाते तेव्हा ते वजन जास्त होते व वाहनाच्या गतिकीवर परिणाम होतो.

अशा प्रकारच्या टायरमध्ये पंक्चर काढण्यासाठी एक कीट मिळते त्यात अतिशय चिकट असे अॅडहेजिव्ह व प्लग्ज असतात त्यांच्या मदतीने टायरला पडलेले छिद्र बुजवले जाते. काही वेळा चक्क पॅच देऊन काम भागवण्याचा प्रयत्न केला जातो पण ते चुकीचे असते. या टायरमध्ये स्टीलचे पातळ पट्टे, नायलॉन, हाय टेन्साइल ब्रीडवायर, इनर लायनर यांचा वापर केलेला असतो त्यामुळे ते मजबूत असतात. त्यांचे पंक्चर मात्र विशिष्ट ठिकाणीच काढून मिळतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..